Parag Pashte, office bearers and farmers participating in the Samvad Yatra after the start of the Farmers Samvad Yatra organized by the Maharashtra Kisan and Farm Labor Congress under the Indian National Congress. esakal
उत्तर महाराष्ट्र

Kisan Samvad Yatra : किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पाष्टे; शेतकरी संवाद यात्रेचा नंदुरबारमधून प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा

Kisan Samvad Yatra : राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत असून, त्यांना सहकार्य करण्याऐवजी राज्य शासन शेतकरीविरोधी असल्याचा आरोप महाराष्ट्र किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पाष्टे यांनी नंदुरबार येथे केला.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसअंतर्गत महाराष्ट्र किसान व शेतमजूर काँग्रेसतर्फे आयोजित शेतकरी संवाद यात्रेचा प्रारंभ नंदुरबार येथे करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.(kisan samvad yatra starts from Nandurbar news)

महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, नंदुरबार येथे प्रारंभावेळी किसान काँग्रेसचे देवाजी चौधरी, जिल्हा काँग्रेसचे कमिटीचे कार्याध्यक्ष सुभाष पाटील, उत्तमराव देसले, अशोक पाटील, राज्य उपाध्यक्ष विश्वंभर बाबर, जगन्नाथ पवार, पंडितराव पवार, राम कुराडे, वाजिद शेख, राजेंद्र पाटील, जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्की पाटील यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे व किसान काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री. पाष्टे म्हणाले, की महाराष्ट्रातील शेतकरी आज प्रचंड अडचणीत आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे, अवकाळी पावसामुळे, तर काही ठिकाणी पडलेल्या भयानक दुष्काळामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. अशा भीषण अवस्थेत राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. राज्यातील हवालदिल शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी किसान काँग्रेसतर्फे नंदुरबार ते नागपूर अशी शेतकरी संवाद यात्रा आयोजित केलेली आहे.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळावी, महाराष्ट्रातील सर्व जिल्हे तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करावेत. गेल्या वर्षीची थकीत व या वर्षातील नुकसानीची विमा रक्कम शेतकऱ्यांना तातडीने मिळावी. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात. शेतीसाठीचा वीजपुरवठा नियमित सुरू ठेवावा.

सोयाबीन, कापूस, मका, भात इत्यादी पिकाला योग्य हमीभाव मिळावा, अशी मागणी. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आम्ही शेतकरी संवाद यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी धाडसी पाऊल उचलले आहे. या संवाद यात्रेचा शेवट नागपूर येथे ११ डिसेंबरला विधानभवनावर आक्रोश मोर्चामध्ये होणार असून, आपल्या न्याय्य हक्कासाठी या भागातील शेतकऱ्यांनी नागपूर मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. पाष्टे यांनी केले.

देवाजी चौधरी, सुभाष पाटील, पंडितराव पवार, ॲड. अशोक पाटील, प्रा. विश्वंभर बाबर यांनीदेखील मनोगत व्यक्त करून राज्य सरकारवर शेतकऱ्याच्या न्याय्य हक्कासाठी परखड टीका केली. राजेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

शहरात किसान रॅली

नंदुरबार येथे शेतकरी संवाद यात्रेचा प्रारंभ झाल्यानंतर श्री. पाष्टे यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार शहरात किसान रॅली काढण्यात आली. नंदुरबार शहरातील महात्मा गांधी पुतळा, शहीद शिरीषकुमार स्मारक, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हार घालण्यात आला. यानिमित्ताने नंदुरबार शहरात किसान काँग्रेसतर्फे सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. त्यामध्ये शेतकरी सहभागी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT