Nandurbar Kite Festival : जिल्हा निवडणूक विभाग साक्षरता मोहिमेंतर्गत पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे हिरा प्रतिष्ठानच्या प्रांगणात सोमवारी (ता. १५) तालुकास्तरीय पतंगोत्सव झाला.
त्यातून मतदानाच्या हक्काची जागृती करण्यात आली. ‘आपले मतदानाचे दान आहे लोकशाहीची शान..!’ हे ब्रीदवाक्य लिहिलेला पतंगोत्सव चांगलाच रंगला. (kite flying in sky raising awareness of right to vote nandurbar news)
मकरसंक्रांतीनिमित्त अण्णासाहेब पी. के. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सोमवारी पतंगोत्सव कार्यक्रम झाला.
हा पतंगोत्सव युवकांचा आनंदोत्सव नव्हे तर शाळा-महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षर भारत निर्माण करणे, भविष्यातील मतदारांना माहितीपूर्ण आणि नैतिक निवडणूक सहभागासाठी तयार करणे तसेच निवडणुकीसाठी तरुणांना सज्ज करणे यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रांताधिकारी विनायक महामुनी यांची विशेष प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते तालुकास्तरीय पतंगोत्सव निवडणूक साक्षरता मोहीम या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. मान्यवरांचा ग्रंथ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी प्रांताधिकारी महामुनी म्हणाले, की विद्यार्थ्यांनी स्वतः अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर आपली नावनोंदणी करून घ्यावी, निवडणुकीचे महत्त्व स्वतः व इतरांनाही समजून द्यावे. विद्यार्थी भावी लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत यासाठी जनजागृती करून भारताच्या विकासास हातभार लावावा, असे आवाहनदेखील त्यांनी केले.
शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनी निवडणूक साक्षर भारत निर्माण होण्याविषयी मार्गदर्शन करत आभार मानले.
उपशिक्षणाधिकारी योजना भावेश सोनवणे, उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, गटशिक्षणाधिकारी नीलेश पाटील, विस्ताराधिकारी जयंत चौरे, विस्ताराधिकारी एस. एन. पाटील, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष कपूरचंद मराठे, प्राचार्य सुरेंद्र पाटील उपस्थित होते.
समारोपप्रसंगी विद्यार्थिनींनी समस्त मान्यवरांना तिळगूळ वाटप करून मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. प्रांताधिकारी महामुनी यांनी मुला-मुलींनी निवडणुकीचे घोषवाक्य लिहिलेले पतंग उडवून पतंगोत्सव साजरा केला.
या उपक्रमात नंदुरबार तालुक्यातील मुख्याध्यापकांसह विद्यार्थ्यांनीही हजेरी लावत पतंगोत्सवात सहभाग नोंदविला. गणेश पवार यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.