Dhule News : धुळ्याला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी मंगळवारी (ता. १३) पहाटे मुंबई-आग्रा महामार्गालगत सोनगीरजवळील बागमळा येथे फुटून लाखो लिटर शुद्ध पाणी वाया गेले.
दुपारी पाणी बंद करण्यात येऊन जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू होते. विशेष म्हणजे गेल्या १५ दिवसांपासून जलवाहिनी फुटली होती. सोमवारी (ता. १२) जलवाहिनी दुरुस्ती करण्यात आली. (Lakhs of liters of water were wasted in Songir due to burst water channel dhule news)
अवघ्या बारा तासांत दुरुस्तीच्या जागीच जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचून चिखल निर्माण झाला. पाणी ३० ते ४० फूट लांब उडत असल्याने मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरपूरकडे जाणारा ट्रॅकवरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.
बाभळे ते सोनगीरदरम्यान जामफळ प्रकल्पामुळे जुनी जलवाहिनीऐवजी वळसा घेत नवीन जलवाहिनी टाकली आहे.
मात्र तेवढा भाग वगळता धुळ्यापर्यंत २२ किलोमीटर जुनी जलवाहिनी असून, ती वारंवार फुटते. अनेक ठिकाणी गळती लागली असून, १५ दिवसांपासून बागमळा येथे जोरदार गळती सुरू होती. दरम्यान, जलवाहिनीला २५ वर्षांहून अधिक काळ झाला असून, ती जीर्ण झाली आहे.
त्यामुळे ती वारंवार फुटते. त्यावर तात्पुरती मलमपट्टी करण्यात येते. पुन्हा अन्य जागी जलवाहिनी फुटते. या पार्श्वभूमीवर दररोज जलवाहिनीची तपासणी होणे व टप्प्याटप्प्यात जलवाहिनी बदलणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.