Leopard esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Leopard News : कोरड्याठाक पाणवठ्यांमुळे वन्यपशू सैरभैर; मनकराई, देऊरचा माथा शिवारात बिबट्याचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा

Dhule Leopard News : गेल्या काही दिवसांपासून येथील मनकराई व देऊरचा माथा शिवारात वन्यपशू बिबट्या सायंकाळी दर्शन देत असून, शेतकरी रात्री शेतात जाण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. तोकड्या पावसाअभावी ऐन पावसाळ्यात वनक्षेत्रातील पाणवठे कोरडेठाक आहेत. अरवी सावजाच्या (शिकार) शोधार्थ फिरणाऱ्या बिबट्यावर पाणी शोधण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, यंदा साक्री तालुक्यात सर्वत्र भीजपावसावर समाधान मानत शेतकऱ्यांनी खरीप पेरण्या गुंडाळण्यात आल्या आहेत. खरिपातील मका, बाजरी यांसारख्या तृणधान्याची पिके कापणीवर आली आहेत. मका, बाजरी पिकात बिबट्या दिवसा दिसूनही तत्काळ अदृश्य होत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. (leopard seen in Mankarai deur matha shivar dhule news)

गेल्या आठवड्यात मनकराई शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात कालवड फस्त झाली होती. देऊर रस्त्यावर दुचाकीस्वारांना तीन दिवस लागोपाठ बिबट्याने सायंकाळी चक्क रस्ता अडवत भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शिवाय सोमवारी (ता. १८) सायंकाळी देऊरचा माथा शिवारात शेतकरी दिवेश दीपक देवरे यांना पन्नास फूट अंतरावर बिबट्याने दर्शन दिले.

मनकराई शिवारात तर दररोज बिबट्या दाखल होत असल्याच्या वृत्ताची माहिती मोबाईलच्या माध्यमातून शेतकरी एकमेकांना देत आहेत. पशुपालक शेतकरी भटू राघो देवरे यांच्या गायी-म्हशींच्या गोठ्यापंर्यत‌ बिबट्या अनेक वेळा पोचत असल्याची चर्चा आहे. बिबट्याची नियमित दहशत असली तरी आता शेतकरीही किती दिवस वन विभागावर अवलंबून राहतील हे वास्तव आहे.

भीती डोळ्यासमोर असूनही शेतकरी स्वतःचे धाडस करत आपले महागडे पशुधन वाचविण्यासाठी प्रयत्न करत असतात. शिवाय रात्रीही विजेरीच्या प्रकाशात शेतात पाणी देण्याची हिंमत ठेवत असल्याचे गांभीर्य वन विभागाने आतातरी घ्यावे अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

ऐन पावसाळ्यात पाणवठे कोरडेठाक

म्हसदीसह परिसरात हजारो हेक्टर वनक्षेत्र असून, सुरक्षित वनक्षेत्रात बिबट्यासह अन्य वन्यपशूंचा मुक्त संचार आहे. यंदा आरंभापासून एकदाही जोरदार पाऊस झाला नाही. पावसाअभावी सर्वच ठिकाणच्या पाणवठ्यात पाणीच नाही. परिणामी भक्ष्यासह पाण्याच्या शोधार्थ वन्यपशू शेतशिवाराकडे धाव घेत आहेत.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

यंदा ऐन पावसाळ्यात वनक्षेत्रातील पाणवठे कोरडेठाक आहेत. उन्हाळ्यात तर यापेक्षा भयावह चित्र असणार आहे. वनक्षेत्रात भक्ष्यच काय सध्या पाणीही नसल्याने वन्यपशू ‘ सैरभैर’ झाल्याचे वन विभागातर्फे मान्य करण्यात आले आहे.

वेडीबाभळीतच बिबट्याचा मुक्काम

वनक्षेत्रात बिनधास्त असणारे बिबटे आता बहुतांश पडीक शेतात नैसर्गिक पद्धतीने उभ्या असणाऱ्या वेडीबाभळीच्या झाडात मुक्कामी असल्याच्या गोष्टीचा दुजोरा प्रत्यक्षदर्शींनी दिला. काही ठिकाणी पडीक जमिनीवर वेडीबाभळींचे रान आहे.

कापणीवर आलेले उंच खरीप पिकात दिवसा बिबटे दबा धरून बसलेले असतात, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. शिवाय बहुतेक शेतकऱ्यांना सकाळी शेतात बिबट्याच्या पावलांची ठसे आढळतात. म्हसदीसह परिसरातील सर्वच शिवारात बिबटे असल्याची माहिती मिळते. याचाच अर्थ एकापेक्षा अधिक बिबटे असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

"सायंकाळी भक्ष्य शोधणारे वन्यपशू बिबटे शेतशिवारातील पाळीव प्राण्यांसाठी असलेल्या हौदातील पाण्यावर आपली तृष्णा भागवतात. अशा वेळी शेतात बांधलेल्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करण्याची शक्यताही नाकारता येत नाही." -भटू मन्साराम देवरे, शेतकरी, म्हसदीी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT