उत्तर महाराष्ट्र

बिबट्याच्या जोडीचा धुमाकूळ; आणि अर्धातास चालेला थरार शेतकऱ्यांनी काही अंतरावरून पाहिला

दगाजी देवरे

म्हसदी : देऊरचा माथा (ता.धळे) शिवारात सोमवारी (ता.1)रात्री बिबट्याच्या जोडीने धुमाकूळ घालत हल्ला चढवत पाच शेळ्या फस्त तर दोन गंभीर जखमी केल्या.सुमारे अर्धा तास चाललेला थरार अनेक शेतक-यांनी काही अंतरावरून अनुभवला.गेल्या काही दिवसांपासून नित्यनेमाने दर्शन देणारी बिबट्याची जोडी आणि बछड्यानी दहशत माजवली आहे.सतत बदलत असलेल्या भारनियमनामुळे शेतकरी रात्ररात्र जागत बिबट्याच्या धास्तीत पिके जगवत आहे. 

देऊरचा माथा शिवारात म्हसदी येथील अनिल रवन पवार या आदिवासी युवकाचा शेळ्यांचा वाडा आहे. काही अंतरावर शेळ्यांचा मालक झोपला असताना बिबट्याच्या जोडीने पाच शेळ्या फस्त तर दोन गंभीर जखमी केल्या आहेत.वनविभागाला माहिती दिल्यावर वनपाल मुकेश सोनार,वनरक्षक गोकुळ जाधव,सुनिल साळुंखे,राकेश पाटील आदींनी पंचनामा केला.नेरचे पशु वैद्यकीय अधिकारी डाॅ.निकम यांनी शव विच्छेदन केले.वेडूअण्णा टेलर, शालीक पवार,गुड्डू देवरे,शांताराम कोकणी,जयेश गुंजाळ उपस्थित होते.तीन दिवसापूर्वीच अनिल पवार यांच्या तीन शेळ्या फस्त केल्या आहेत. 


मोठे नुकसान...
दरम्यान,सुशिक्षित आदिवासी युवकांने कर्ज काढत नुकताच शेळी पालन व्यवसाय सुरू केला.अवघ्या आठवड्यात आठ शेळ्या फस्त झाल्याने सबंधीत युवक व पवार कुटुंबाने धास्ती घेतली आहे.रानोमाळी वणवण करत शेळ्या फिरवणारा युवक आज पुन्हा बेरोजगार झाला आहे.वनविभागाने नुकसानीची भरपाई शेतक-यांना व शेळ्या - मेंढ्या पालकांना भयमुक्त करावे अशी मागणी केली जात आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स तेजीत?

IND vs AUS : विराट कोहलीला खुणावतोय राहुल द्रविडचा विक्रम; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हव्यात फक्त १०२ धावा

तर 'कुछ कुछ होता हैं' मध्ये राणी मुखर्जी ऐवजी दिसली असती ऐश्वर्या राय; 'या' कारणामुळे दिलेला नकार, म्हणालेली-

Stock Market: कोण आहेत FPI आणि FII? त्यांच्यामुळे शेअर बाजार कोसळतो अन् तेजीत येतो?

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

SCROLL FOR NEXT