crime  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : पित्याच्या खूनप्रकरणी मुलाला जन्मठेप; शिरपूर तालुक्यातील घटना

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पित्यावर चाकूने वार करीत खून करणाऱ्या मुलाला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. मलाबादे यांनी हा निकाल दिला.( Life imprisonment for son in case of father murder dhule crime news)

सुखराम पेमा पावरा (रा. कढईपाणी-उर्मदा, ता. शिरपूर) असे आरोपीचे नाव आहे. त्याचे पत्नी बायटाबाई पावरा यांच्याशी १६ जून २०२२ ला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घरी भांडण सुरू होते. त्या वेळी वडील पेमा पावरा भांडण सोडविण्यासाठी गेले असता सुखरामने त्यांना शिवीगाळ करून पाठीत चाकूने वार करून जखमी केले.

त्यामुळे पेमा पावरा रक्ताच्या थारोळ्यात पडले. ही घटना पेमा पावरा यांची पत्नी शिमलीबाई पावरा हिने प्रत्यक्ष पाहिली होती. घटनेनंतर सुखराम पळून गेला. त्यानंतर पेमा पावरा यांचा मुलगा विक्रम पावरा शेतातून सायंकाळी घरी आला, तेव्हा त्याच्या आईने त्याच्यासह ग्रामस्थांना घटनाक्रम सांगितला.

त्यानंतर जखमी पेमा पावरा यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याबाबत शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात सुखराम पावरा याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाट यांनी करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले.

खटल्याचे कामकाज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मलाबादे यांच्यापुढे चालले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता संजय मुरक्या यांनी आठ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. पैकी मृत पेमा पावरा यांची पत्नी, शवविच्छेदन करणारे डॉक्टर तसेच तपासी अधिकारी यांच्या न्यायालयातील साक्षी झाल्या.

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता संजय मुरक्या यांनी युक्तिवाद करून सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले. त्यावरून न्यायालयाने पेमा पावरा यांचा चाकूने हल्ला करून खून केल्याचे ग्राह्य धरले. न्यायालयाने सुखराम पावरा याला जन्मठेपेची शिक्षा व १० हजारांचा दंड सुनावला. तसेच दंड न भरल्यास त्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.

सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता संजय मुरक्या यांनी कामकाज पाहिले. त्यांना जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह योगेंद्रसिंह तवर व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता बी. डी. भोईटे यांचे सहकार्य लाभले. तसेच पैरवी अधिकारी जडे व चव्हाण यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

Latest Maharashtra News Updates : पोलिस असल्याच्या बहाण्याने सराफाची फसवणूक

Sharad Pawar : पवार, मुंडे यांनी बीडमधील राष्ट्रवादीतील कलह मिटवला, महायुतीच्या क्षीरसागरांना मिळाले समर्थन

Pune Crime News: पाकिटावर लिहिलं ५० हजार रुपये! आतमध्ये निघाली कागदं; पुण्यात पोलिस असल्याचा बनाव करुन सराफाची फसवणूक

SCROLL FOR NEXT