Assistant Inspector Suresh Shirasat and colleagues with confiscated liquor stock. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : शिरपूर-हाडाखेडजवळ मद्यसाठा जप्त; महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन बळ दिल्याचे परिणाम तालुक्यात जाणवून येत आहेत.

सांगवी येथील तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. १९) कारवाई करून अवैध मद्यसाठा व ट्रक असा ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.(Liquor stock seized near Shirpur Hadakhed dhule crime news)

सांगवी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाट यांना आयशर मद्याची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्या आदेशावरून पोलिसांचे पथक महामार्गावर पेट्रोलिंग करीत संशयितांचा शोध घेत होते. हाडाखेड (ता. शिरपूर) येथील जय बाबारी हॉटेलजवळ आयशर ट्रक (एनएल ०७, एए ३५०३) आढळले.

वाहनचालकाला थांबवून ट्रक ताब्यात घेऊन सांगवी येथे नेल्यानंतर तपासणी करण्यात आली. ट्रकमध्ये ऑल सिजन कंपनीच्या व्हिस्कीची ७५० मिली बाटल्यांची ४० खोकी, रॉयल चॅलेंज व्हिस्कीची ६० खोकी, मॅक्डोवेल्स नंबर वन कंपनीच्या ७५० मिली बाटल्यांची २०, तर १८० मिलीच्या बाटल्यांनी भरलेली १५० खोकी व काफसबर्ग कंपनीच्या ५०० मिलीच्या बाटल्यांनी भरलेली १० खोकी आढळली.

जप्त ब्रॅंडवर केवळ पंजाब राज्यात विक्रीसाठी परवानगी असल्याचे नमूद केले आहे. ट्रकसह या मुद्देमालाची एकूण किंमत ३१ लाख ३३ हजार २०० रुपये आहे. ट्रकचालक सुनीलकुमार राजपाल जाट (वय २८, रा. हरियाना) याला अटक करण्यात आली.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे, डीवायएसपी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाट, उपनिरीक्षक सुनील वसावे, हवालदार संतोष पाटील, संदीप ठाकरे, योगेश मोरे, दिनकर पवार, स्वप्नील बांगर, अल्ताफ मिर्झा यांनी ही कारवाई केली.

कारवाईची हॅट्‍ट्रिक

यापूर्वी १५ डिसेंबरला सांगवी पोलिसांनी गुटख्याने भरलेला कंटेनर पकडला होता. १८ डिसेंबरला ३२ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला. पाठोपाठ मंगळवारी १६ लाखांचा मद्यसाठा पकडण्यात पोलिसांना यश आले. त्यामुळे अवैध मद्यविक्रीचे हायवेवरील प्रवेशद्वारच पोलिसांनी जखडून ठेवल्याचे मानले जात असून, नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Instagram Reels: इंस्टाग्राम रील्सवर 1 मिलियन व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? रक्कम जाणून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT