Deputy Superintendent of Police Sachin Hire, Assistant Inspector Suresh Shirasat and officials while inspecting the seized liquor stock. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : हाडाखेडजवळ साडेआठ लाखांचा मद्यसाठा जप्त

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : चंडीगड केंद्रशासित प्रदेशात विक्रीची परवानगी आलेल्या मद्याची अवैध वाहतूक करणारा ट्रक सांगवी पोलिसांनी गुरुवारी (ता. ७) सकाळी हाडाखेड (ता. शिरपूर) येथे जप्त केला.

या कारवाईत ट्रकसह एकूण २३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला.(Liquor stock worth eight lakh seized near Hadakhed dhule crime news)

सांगवीचे सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाट यांना मध्य प्रदेशातून महाराष्ट्राकडे अवैध मद्याची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्या आदेशावरून पोलिसांनी पेट्रोलिंग सुरू केले.

हाडाखेड येथील सीमा तपासणी नाक्यावर पोलिसांच्या वाहनाला पाहून आयशर ट्रक (एनएल ०१, एसी २८७६) चालकाने वेगाने पळविली. पोलिस पाठलागावर असल्याचे लक्षात येताच काही अंतरावर ट्रक उभा करून तो पळून गेला.

साडेआठ लाखांचा मद्यसाठा

ट्रकच्या झडतीत वेगवेगळ्या कंपन्यांचा सुमारे साडेआठ लाख रुपये किमतीचा मद्यसाठा आढळला. ट्रकसह या मुद्देमालाची एकूण किमत २३ लाख ४०० रुपये आहे. संशयितावर सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाट, उपनिरीक्षक सुनील वसावे, मंगला पवार, पोलिस नाईक संदीप ठाकरे, हवालदार कृष्णा पावरा, संतोष पाटील, इसरार फारुकी यांनी ही कामगिरी बजावली.

मोबाईलवर परवानगी

पोलिस ट्रकची झडती घेत असताना केबिनमध्ये मोबाईल आढळला. काही वेळाने मोबाईल वाजल्याने पोलिसांनी संपर्क साधला. पलीकडून बोलणाऱ्या ट्रकमालकाकडून पोलिसांनी ट्रकचे सील काढण्याची परवानगी मागितली. त्याने होकार दिल्यानंतर पोलिसांनी सील काढून झडती घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Constituency: मनसेनं २००९ मध्ये कोणते मतदारसंघ जिंकले होते? ते आमदार आता कुठे आहेत? राज ठाकरेंना पुन्हा यश येणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Tax Evasion: देशात 18,000 बनावट कंपन्या; सरकारची 25,000 कोटी रुपयांची फसवणूक, काय आहे प्रकरण?

शेवटी आईच ती! दिवाळीच्या सुट्ट्या संपवून शूटिंगला परतणाऱ्या सिम्बाला निरोप देताना हमसून रडली माउली, नेटकरी म्हणाले-

Sawantwadi Election : सावंतवाडीत राजकीय 'संशयकल्लोळ'; बंडखोरीमुळे मतदारसंघात पेच, कोण कोणाची मते पळवणार?

SCROLL FOR NEXT