Crime News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime : कळंबारी शिवारात पावणेदोन लाखांचा मद्यसाठा जप्त

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime : येथील पोलिसांनी मळगाव (ता. साक्री) शिवारातील कळंबारीत महाराष्ट्रातून गुजरातला विक्रीस जाणारा एक लाख ७२ हजारांचा देशी-विदेशी मद्यसाठा एका चारचाकीमधून जप्त केला.

मात्र कारवाई दरम्यान अंधाराचा फायदा घेत चालक फरार झाला. याबाबत पिंपळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Liquor stocks worth 2 lakh seized in Kalamkari Shiva dhule crime news)

जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी मद्य तस्करीचे उच्चाटन करण्याविषयी मासिक गुन्हे आढावा बैठकीत सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने शुक्रवारी (ता. ९) रात्री साडेआठच्या सुमारास आंतरराज्य सीमा भागात पेट्रोलिंग सुरू असताना पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे यांना अवैध मद्य तस्करीविषयी माहिती मिळाली.

त्यानुसार नवापूर रोडवरील मळगाव (ता. साक्री) शिवारातील कळंबारीत पेट्रोलिंग करीत असताना पथकासह (जीजे 27, बीएस 6487) क्रमांकाची संशयित कार दिसली. या कारला थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालक काही अंतर कार सुसाट वेगाने पळवून घेऊन गेला. अंधाराचा फायदा घेत कार लॉक करून त्याने पोबारा केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पथकाने कारची झाडाझडती घेतली असता या कारच्या मागील सीटवर तसेच डिक्कीत देशी-विदेशी मद्यसाठा आढळून आला. या कारवाईत एक लाख ७२ हजार दोनशे रुपये किमतीच्या मद्यसाठ्यासह दहा लाखांची कार असा एकूण अकरा लाख ७२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पिंपळनेर पोलिसांनी जप्त केला.

पुढील तपास बी. आर. पिंपळे हे करीत आहेत. सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे, भाईदास माचले, लक्ष्मण गवळी, कांतिलाल अहिरे, प्रकाश सोनवणे, राकेश बोरसे, संदीप पावरा, पंकज माळी, कैलास कोळी, रवींद्र सूर्यवंशी, पंकज वाघ, नरेंद्र परदेशी या पथकाने केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

138 crore gold seized In Pune: पुण्यात सापडले घबाड! निवडणुकीच्या धामधुमीत पोलिसांनी जप्त केले 138 कोटींचे सोने; 'तो' टेम्पो कोणाचा?

Rajan Salvi : 'मविआचे 188 उमेदवार विजयी होतील, त्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री आणि मी मंत्री होईन'

IPL 2025 Retention : काव्या मारनची एक 'खेळी' अन् Rishabh Pant, KL Rahul, Shreyas Iyer सह बंडाला पेटली 'मंडळी'!

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

IND vs NZ: नशीबानं संधी मिळाली अन् Mitchell Santner ने ७ विकेट्स घेत सोनं केलं; भारताविरुद्ध मोठ्या विक्रमांना घातली गवसणी

SCROLL FOR NEXT