Dhule Crime News : दहशत माजविण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा बाळगणाऱ्याला मंगळवारी (ता. ३१) दुपारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली.
त्याच्याकडून गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतुसे असा एकूण ४२ हजार किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ( local crime investigation branch team arrested gavathi katta bearer dhule crime news )
विशाल भरत पाटील (रा. शांतीनगर, मिल परिसर, सुरतवाला बिल्डिंगमागे, धुळे) हा दहशत माजविण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा घेऊन फिरत असतो. तो मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस भवन कार्यालयाजवळील हजरत चांद शहावली बाबा दर्ग्याजवळ रस्त्यावर उभा असल्याची माहिती एलसीबीचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली.
त्यांनी तत्काळ पथकाला कारवाईसाठी रवाना केले. पोलिसांची चाहूल लागताच विशाल पाटील याने पळण्याचा प्रयत्न केला.
मात्र, पथकाने त्यास पकडून त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ गावठी कट्टा व दोन काडतुसे मिळून आली. त्याच्याकडे शस्त्र परवान्याबाबत विचारपूस केली असता त्याने परवाना नसल्याचे सांगितले. त्यामुळे बेकायदेशीररीत्या कट्टा बाळगत असल्याची खात्री झाल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व दोन हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे असा एकूण ४२ हजारांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला. विशाल पाटील याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिंदे, पोलिस उपनिरीक्षक अमरजित मोरे, बाळासाहेब सूर्यवंशी, मच्छिंद्र पाटील, रविकिरण राठोड, नीलेश पोतदार, सुशील शेंडे, हर्शल चौधरी, गुणवंत पाटील, सागर शिर्के यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.