Khandlai Budruk (Dhule district): A tree uprooted on Monday due to bad weather, in the second photo, water accumulated in the harvested onion crop in the field, and in the last photo, broken electric wires. esakal
उत्तर महाराष्ट्र

Unseasonal Rain News : अवकाळी वादळी वारा, पाऊसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान; विजपुरवठा खंडित

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : खंडलाय बुद्रूक (जि. धुळे) परिसरात आज झालेल्या जोरदार वादळी वारा, मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचा कांदा, भुईमूग, मका, भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले आहे.

तसेच खंडलाय येथील माध्यमिक शाळेलगत शेतीशिवारात काही विजेचे पोल अर्ध्यावर तुटून विजेच्या तारा जमिनीवर येऊन पडल्या आहेत. परंतु नुकसानीमुळे प्रसंगी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (Loss of farmers due to unseasonal wind rain Power Outage Dhule News )

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पाळीव प्राण्यांचा चाऱ्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवारातील झाडे उन्मळून रस्त्यावर पडल्यामुळे दळणवळण विस्कळित झाली. यामुळे गावातील, शेतातील वीज खंडित झाली आहे.

बऱ्याच शेतकऱ्यांची कापूस लागवडीची लगबग सुरू झाली असल्यामुळे कापसाला पाणी देणे महत्त्वाचे असल्याने परिस्थिती पूर्वपदावर येणेसाठी तत्काळ महावितरण अधिकारी, कर्मचारी, महसूल विभागातील प्रशासनाने तत्काळ नुकसानीचा पंचनामा करावा, झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, अशी मागणी खंडलाय येथील गटप्रमुख आबा पगारे, सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी नारायण माळी, आनंदा पाटील, दादा कोळी, सुरेश कोळी, बारकू निकम आदी शेतकऱ्यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT