Mahavitaran sakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : शेतकऱ्यांना वीजजोडणीसाठी महावितरणचे प्राधान्य; वर्षभरात सर्वाधिक कनेक्शन

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : महावितरणने २०२२-२३ या नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात एक लाख ७० हजार २६३ कृषिपंपांना वीज कनेक्शन देऊन दहा वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. (Mahadistrivans priority for electricity connection to farmers nandurbar news)

कृषिपंपांना दहा वर्षांतील सर्वाधिक वीज कनेक्शन देण्यासोबतच प्रलंबित कनेक्शनची संख्या आतापर्यंतची सर्वांत कमी झाल्याने महावितरणला दुहेरी यश मिळाले आहे.

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी ऊर्जा खात्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर महावितरणला शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शनचा पेड पेंडिंगचा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्याची सूचना केली होती.

शेतकऱ्यांनी वीज कनेक्शनसाठी पैसे भरल्यानंतर कृषिपंपासाठी प्रत्यक्ष कनेक्शन मिळण्यास विलंब होतो, त्याला पेड पेंडिंग म्हणतात. ऊर्जामंत्र्यांच्या आदेशानुसार कृषिपंपांना प्राधान्याने वीज कनेक्शन देण्यासाठी महावितरणने योजना आखली. अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत गेल्या दहा वर्षांमध्ये एका आर्थिक वर्षातील कृषिपंपांची सर्वाधिक वीज कनेक्शन देण्यात यश मिळविले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

यापूर्वी २०१९-२० या आर्थिक वर्षात ९६ हजार ३२७, २०२०-२१ या आर्थिक वर्षात एक लाख १७ हजार ३०४ आणि २०२१-२२ या आर्थिक वर्षात एक लाख ४५ हजार ८६७ कृषिपंपांना वीज कनेक्शन देण्यात आली होती.

महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीमुळे कृषिपंपांच्या प्रलंबित वीज कनेक्शनची संख्या कमी होऊन ती एक लाख सहा हजार ३४० इतकी झाली आहे. ही आतापर्यंतची एका आर्थिक वर्षातील सर्वांत कमी संख्या आहे.

याआधी २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या अखेरीस प्रलंबित कनेक्शनची संख्या एक लाख ६७ हजार ३८३ होती, तर २०२०-२१ मध्ये एक लाख ८४ हजार ६१३ आणि २०२१-२२ मध्ये एक लाख ८० हजार १०४ होती.महावितरणने नुकत्याच संपलेल्या २०२२-२३ या आर्थिक वर्षात दिलेल्या कृषिपंपांच्या कनेक्शनचे वैशिष्ट्य म्हणजे या वर्षात महावितरणने एकूण एक लाख ७० हजार कनेक्शनपैकी एक लाख ५९ हजार कनेक्शन पारंपरिक पद्धतीने दिली आहेत.

सौरपंप किंवा उच्चदाब वितरण प्रणाली या विशेष योजनांतील केवळ ११ हजार कनेक्शन आहेत. याआधीच्या वर्षात दिलेल्या एक लाख ४५ हजार ८६७ कृषिपंप कनेक्शनपैकी ४६ हजार १७५ कनेक्शन ही सौर किंवा उच्च वीजदाब प्रणालीतील होती. २०२२-२३ मध्ये सौर आणि उच्चदाब वितरण प्रणाली योजनांचा फारसा आधार नसताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने दिलेल्या कनेक्शनची कामगिरी उल्लेखनीय आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT