Rajesh Padvi 
उत्तर महाराष्ट्र

शहादा : पोलिस निरीक्षक झाले आमदार | : Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा

शहादा : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा- तळोदा मतदार संघातून भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्र पक्षाचे उमेदवार राजेश पाडवी 7 हजार 987 मतांनी विजयी झाले. मुंबई येथून पोलिस निरीक्षक पदाचा राजीनामा देवून निवडणुक लढविल्यानंतर पाडवी विजयी झाले. 

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा- तळोदा मतदार संघातून कॉंग्रेस आघाडीतर्फे ऍड. पद्माकर वळवी यांच्या विरूद्ध भाजपकडून राजेश पाडवी यांनी निवडणुक लढविली. निवडणुकीत त्यांना 94 हजार 918 मते मिळाली. श्री. पाडवी हे मुंबई येथे पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत होते. त्यांनी पदाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला होता. यानंतर भाजपच्या तिकीटावर प्रथमच निवडणूक लढविली. कॉंग्रेस आघाडीतर्फे माजी मंत्री ऍड. पद्माकर वळवी यांनी निवडणूक लढविली. त्यांना 86 हजार 931 मते मिळाली; तर माकपचे जयसिंग माळी यांना 4 हजार 59 व अपक्ष उमेदवार जेलसिंग पावरा यांना 21 हजार 821 मते मिळाली. 

जल्लोष, आनंदोस्तव..
दरम्यान, मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. सातव्या फेरीपर्यंत कॉंग्रेसचे उमेदवार आघाडीवर होते. आठव्या फेरीनंतर भाजपचे उमेदवार राजेश पाडवी यांनी आघाडी घेतली. मतांचा आघाडीत शेवटच्या फेरीपर्यंत वाढ होत राहिली. दरम्यान शहरात पक्षाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी फटाके उडवत रॅली काढून आनंदोत्सव साजरा केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT