विधानसभा 2019 :
नाशिक - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला प्रारंभ झाला असून, राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सभा होत आहेत. या सभांसाठी ज्या जिल्ह्यांमध्ये अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सभा होत आहेत, त्या जिल्ह्यांच्या पोलिस प्रमुखांकडून ‘नाशिक पॅटर्न’ बंदोबस्ताच्या नियोजनाची मागणी होत आहे.
गेल्या महिन्यात नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपची महाजनादेश यात्रा आणि दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी सभा झाली होती. यासाठी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत सूक्ष्म पद्धतीने आणि तितक्याच सुनियोजितरीत्या पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले होते. परिणामी, पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण आलेला असतानाही, तो तितक्याच नियोजनबद्धतेमुळे निर्विघ्न पार पडला होता. या बंदोबस्ताची दखल पोलिस महासंचालक व गृहविभागानेही घेतली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.