Dhule News : परिसरात सलग आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कान नदीवरील मालनगाव मध्यम प्रकल्प शनिवारी (ता. २९) ओव्हरफ्लो झाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. (Malangaon Medium Project on Kan River overflowed dhule news)
या प्रकल्पाची क्षमता ४००.१२ दशलक्ष घनफूट आहे. गेल्या काही दिवसांपासून आमळी व कान नदीच्या उगमस्थानावरही मुसळधार पाऊस झाल्याने परिसराला अक्षरशः झोडपून काढले. कान नदीला पूर आला असून, शेतशिवारातील नाले दुथडी भरून वाहत आहेत, तर सखल भागात पाणी साचले आहे.
परिसरात आषाढी एकादशीपासून पावसाचा जोर कायम असून, संततधार सुरूच आहे. परिसरात प्रारंभीचे मृग नक्षत्र कोरडे गेले, मात्र आर्द्रा नक्षत्राच्या अखेरच्या टप्प्यात पाऊस झाल्याने त्यात शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यानंतर पुनर्वसू व पुष्य नक्षत्रात दमदार हजेरी लावली. गेल्या आठवडाभरापासून आमळीत सूर्यदर्शन झाले नाही.
परिसरात पाऊस सक्रिय असून, यंदा उशिरा पावसाचे आगमन झाले. उशिरा का होईना सध्या दमदार होत आहे. मात्र सततच्या पावसामुळे कोळपणी, निंदणी आंतरमशागतीची कामे, फवारणी व पिकांना खताची मात्राही देता येत नसल्याने शेतीची कामे ठप्प आहेत.
मात्र सध्या भात, नागली पुनर्लागवडीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान, कान नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.