mukesh bhavsar  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Bribe Crime : मंडल अधिकारी मुकेश भावसारला 2 हजारांची लाच घेताना पकडले

सकाळ वृत्तसेवा

Dhule Bribe Crime : सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना जवखेडा (ता. शिरपूर) येथील मंडळ अधिकारी मुकेश श्रीकांत भावसार (४२) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (ता. २) पकडले.

धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अभिषेक पाटील व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.(Mandal officer Mukesh Bhavsar was caught accepting bribe of 2 thousand dhule news)

वरुळ (ता. शिरपूर) शिवारात असलेल्या शेतजमिनीची तक्रारदार आणि त्याची बहीण यांच्यात वाटणी करून देण्याबाबत शिरपूरच्या वरिष्ठ दिवाणी न्यायालयाने आदेश दिला होता. या आदेशाची प्रत जोडून तक्रारदाराने तहसीलदारांकडे मागणी अर्ज सादर केला.

संबंधित तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी अर्जावर कार्यवाही करून सातबाऱ्यावर नावनोंदणी करून दिली. नोंदणीचे काम पूर्ण केल्यानंतर त्याच्या मोबदल्यात मंडळ अधिकारी मुकेश भावसार यांनी तक्रारदाराकडे दोन हजारांची लाच मागितली.

तक्रारदाराने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधून माहिती दिली. विभागातर्फे तक्रारीची खात्री करण्यात आली. दोन हजार रुपये स्वीकारताना गुरुवारी संशयित भावसार याला पकडण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी, वाचक उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील, पोलिस निरीक्षक हेमंत बेंडाळे, हवालदार राजन कदम, पोलिस नाईक संतोष पावरा, सुधीर मोरे यांनी ही कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT