Dhule: Police inspector Anand Kokre and the search team present during the inspection of the seized manja stock. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : पोलिसांकडून मांजा साठा जप्त; 2 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

धुळे : जीवनास घातक ठरणाऱ्या व प्रतिबंधित मांजाची विक्री करणाऱ्या धुळे व शिरपूर येथील दोन संशयितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच, त्यांच्याकडून एकूण १७ हजारावर मुद्देमाल जप्त केला.

पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी आगामी संक्राती सणाच्या पार्श्वभूमीवर मांजा प्रकरणी कारवाईचा आदेश दिला. नाशिक विभागीय आयुक्तांनी कार्यक्षेत्रातील पाच जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांसह पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षकांना राज्यात प्रतिबंधित नॉयलॉनच्या मांजा प्रकरणी कारवाईचे निर्देश दिले. (Manja stocks seized by police case has been registered against 2 suspects dhule news)

संक्रांती सणानिमित्त व ऐरवी पंतगबाजीसाठी मांजा वापरल्यास मनुष्य, पशू- पक्षांना गंभीर शारीरीक इजा किंवा प्रसंगी जीव गमावण्याची वेळ येते. तशा अनुचित घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे पतंग उडविण्यावेळी प्रतिबंधित नॉयलॉन मांजा विक्री व तो साठवणुकदारांवर तत्काळ कारवाईची सूचनाही दिली गेली.

या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांनी संयुक्त कारवाईतून धुळे शहरातील गल्ली क्रमांक दोनमधील गोल बिल्डींग मागे तिरुपती गॅस एजन्सीजवळ पूजा पतंग नामक दुकानावर मंगळवारी (ता. २७) छापा टाकला. तेथे मांजा विक्री व साठवणूक थांबवून कारवाईत सात हजार २२० किमतीचा साठा जप्त केला. या प्रकरणी संशयित दुकानमालक पप्पूसिंग प्रभुसिंग परदेशी (वय ३५, रा. प्लॉट नं. १७, दीपनगर, शासकीय दूध डेअरीमागे, धुळे) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच...

शिरपूरला कारवाई

शिरपूर : प्रतिबंधित नायलॉन मांजाचा साठा विक्रीसाठी बाळगल्याच्या संशयावरून शहरात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी दुपारी केलेल्या या कारवाईत एकूण दहा हजार ७४० रुपये किमतीचे मांजाचे रीळ जप्त करण्यात आले. मेनरोडवर तारण जनरल स्टोअर्स या दुकानावर छापा टाकून पोलिसांनी ही कारवाई केली. नायलॉन मांजाला विक्रीसाठी प्रतिबंध असूनही संशयिताने दुकानात मांजाचे रीळ विक्रीसाठी ठेवल्याची माहिती निरीक्षक ए. एस. आगरकर यांना मिळाली.

शोध पथकाचे हवालदार ललित पाटील, लादूराम चौधरी, पोलिस नाईक मनोज पाटील, गोविंद कोळी, विनोद आखडमल, प्रवीण गोसावी, मुकेश पावरा, प्रशांत पवार यांनी दुकानावर छापा टाकला. दुकानदार रवींद्र भगवानदास जैन (वय ४३, रा. सुमतीनाथनगर, शिरपूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संक्रांतीच्या सणानिमित्त पतंग उडवताना कोणीही प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री किंवा वापर करू नये, तसे आढळल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT