manoj jarange patil  Esakal
उत्तर महाराष्ट्र

Manoj Jarange Patil Dhule: मनोज जरांगे-पाटील यांची 3 डिसेंबरला सभा; एक लाख समाजबांधव येणार

सकाळ वृत्तसेवा

Manoj Jarange Patil Dhule: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाजात जागृती निर्माण करून एकजूट ठेवण्याचा संदेश देण्यासाठी महाराष्ट्रभरात दौऱ्यावर असलेले मनोज जरांगे-पाटील यांची ३ डिसेंबरला दुपारी एकला धुळ्यातील फाशीपुल येथे सभा होणार आहे.

या सभेचे नियोजन सुरू असून सभेला जिल्ह्यातून एक ते दीड लाख समाजबांधव उपस्थित राहतील, अशी माहिती सकल मराठा समाज कोअर कमिटीच्या सदस्यांनी दिली. सकल मराठा समाजाच्या बॅनरखाली ही सभा होत असल्याचे सदस्यांनी स्पष्ट केले. (Manoj Jarange Patil Dhule on 3 december news)

श्री. जरांगे-पाटील यांच्या धुळ्यातील सभेबाबत सकल मराठा समाजाच्या कोअर कमिटी सदस्यांनी मराठा सेवा संघाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. भानुदास बगदे, सुधाकर बेंद्रे, साहेबराव देसाई, निंबा मराठे, विनोद जगताप, संदीप पाटोळे आदींनी सभेच्या अनुषंगाने माहिती दिली. अंतरवाली सराटी (जि. जालना) येथून आंदोलन सुरू करणारे जरांगे-पाटील सध्या राज्यभरात दौऱ्यावर आहेत.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला बळ मिळावे, यासाठी ते विविध ठिकाणी सभा घेत आहेत. यात ३ डिसेंबरला धुळे शहरात त्यांची जाहीर सभा प्रस्तावित असल्याचे सदस्यांनी सांगितले. श्री. जरांगे-पाटील यांचे विचार जिल्ह्यातील जनमानसापर्यंत पोचावेत, या उद्देशाने जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने छत्रपती संभाजीनगर येथे श्री. जरांगे पाटील यांची भेट घेतली. या वेळी त्यांना धुळ्यात येण्याचे निमंत्रण दिले.

श्री. जरांगे-पाटील यांनी त्यास होकार दिला असून, ३ डिसेंबरला त्यांची धुळ्यात सभा होईल. त्यांचे धुळ्यात तोलामोलाचे स्वागत आणि सभेचे नियोजन सकल मराठा समाजाने केले आहे.

लाखाव समाजबांधव येणार

पहिल्यांदाच श्री. जरांगे-पाटील धुळ्यात येत असल्याने शहरासह जिल्हाभरातून किमान एक ते दीड लाख समाजबांधवांची सभेला उपस्थिती असेल, यात महिलांची उपस्थिती लक्षणीय राहील, असा विश्‍वास कोअर कमिटी सदस्यांनी व्यक्त केला. सभेला येणाऱ्या समाजबांधवांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी नियोजन करण्यात येत आहे. सभास्थळाच्या आजूबाजूला विविध ठिकाणी वाहनातळाची व्यवस्था करण्याचे नियोजन असल्याचेही सदस्यांनी सांगितले.

कोअर कमिटीत १०० सदस्यांचा समावेश असून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव अशी कोणतीही पदे नाहीत, समाजातील विविध संघटनांच्या सर्व सदस्यांचा समावेश यात करण्यात आला आहे. सभेसाठीचा आर्थिक भार कोअर कमिटी स्वत: उचलणार आहे. सभेस समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा समाजातर्फे कोअर कमिटीने केले. दीपक रौंदळ, कैलास मराठे, दिनेश काळे, भय्या शिंदे, मनोज ढवळे, सुनील ठाणगे, वामन मोहिते, गोविंद वाघ, श्याम निरगुडे आदी कोर कमिटी सदस्य उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT