sakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Fraud Doctor: बोगस बंगाली डॉक्टरांविरुद्ध मोहीम राबविण्याची गरज; स्थानिक आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

बोगस डॉक्टर रुग्णांची कुठल्याही प्रकारची तपासणी न करता रुग्णांना औषधांचा ओव्हर डोस देतात, म्हणून रुग्ण एक-दोन दिवसांत बरा होतो.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Fraud Doctor : शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागातील जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन विविध गावांसह दुर्गम गाव-पाड्यांत अनेक बंगाली व अन्य बोगस डॉक्टर सर्रास उपचार करत असून, कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना हे बोगस डॉक्टर आदिवासी, गोरगरीब जनतेच्या जिवाशी खेळत आहेत.

बोगस डॉक्टर रुग्णांची कुठल्याही प्रकारची तपासणी न करता रुग्णांना औषधांचा ओव्हर डोस देतात, म्हणून रुग्ण एक-दोन दिवसांत बरा होतो. (Many Bengalis and other bogus doctors are treating people widely in dhule news)

पण काहींना या ओव्हर डोसचा त्रास होऊन त्यांना तालुक्यासह शहरातील मोठ्या दवाखान्यात उपचारासाठी जावे लागते व या रुग्णांना मानसिक त्रास व आर्थिक फटका बसतो. काही रुग्णांचा चुकीचा उपचार होत असल्यामुळे जीव गमवावे लागतात. म्हणून शासनाने या बोगस डॉक्टरांवर कायमस्वरूपी बंदोबस्त केला पाहिजे, असे ग्रामस्थांची मागणी आहे.

या आदिवासी भागात आरोग्य विभागाचे पाच प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. रोहिणी, सांगवी, वकवाड, बोराडी, वाडी व त्यांना अनेक उपकेंद्र असतानासुद्धा यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू आहे. या बोगस डॉक्टरांवर शासनाची मेहेरबानी आहे की काय, असा प्रश्न निर्माण होतो. वकवाड, दुर्बड्या, शेमल्या, पळासनेर, पनाखेड, सांगवी, जोयदा, आंबा, खंबाळे, सुळे, रोहिणी, बोराडी, मालकातर, उर्मदा, आदिवासी भागातील प्रत्येक गावात कानाकोपऱ्यात भाड्याचे घर घेऊन घरात राजरोसपणे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू आहे.

त्यांच्याविषयी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तक्रार दिल्यास फिर्यादीवर स्थानिक पदाधिकारीचा दबावतंत्राचा वापर करून प्रकरण दडपली जातात. म्हणून यांचावर कोणाचा धाक नसल्यामुळे हे ‘मुन्नाभाई’ बिनधास्तपणे राहातात.

गावातील लोकप्रतिनिधीचे ही दुर्लक्ष

बंगाली डॉक्टरांकडे (बीआयएएमएस) बंगाल राज्यातील प्रमाणपत्र आहेत व अन्य डॉक्टरांकडे कसलीही पदवी नसतांना बनावट बीएएमएस पदवीचे प्रमाणपत्र दाखवतात. काहींकडे आयुर्वेदिक पदव्या घेत ॲलोपॅथिक औषधे वापरले जाऊनही अधिकृत डॉक्टरांच्या नावाखाली रुगणाच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार थांबविणे सहज शक्य आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधीही याकडे गांभीर्याने पाहायला तयार नाही, म्हणून आरोग्य विभागाला याप्रकरणाविषयी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

बोगस डॉक्टर शोधमोहीम फक्त नावापुरती का?

जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध शासनाने वेळोवेळी निर्देशित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे आवश्यक कार्यवाही करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणेने सामूहिक धडक मोहीम राबवावी, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांनी सात महिन्यांपूर्वी दिले असता, समितीही तयार करण्यात आलीड परंतु समितीने तालुक्यात कुठल्याही बोगस डॉक्टरांवर आजपर्यंत कार्यवाही झालेली नाही. समिती फक्त नावालाच का, असा प्रश्न ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT