esakal
उत्तर महाराष्ट्र

Nashik News : आदिवासी नागरिकांना सापडली प्रकाशाची वाट..

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी (जि. नाशिक) : नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये आजही खऱ्या अर्थाने वीज (Electricity) पोहोचलेली नाही.

त्यात आदिवासी वाड्यापाड्यांची दशा आणि दिशा सांगायला नको एवढी वाईट आहे. (Many villages of Igatpuri taluka in district have not really reached electricity even today nashik news)

अशा भयानक परिस्थितीत विजेचा लपंडाव असणाऱ्या जामुंडे आदिवासी गावातील आदिवासी नागरिकांना अंधारामध्ये कसेबसे दिवस काढावे लागत होते. ग्रामपंचायत मानवेढे येथील सरपंच, उपसरपंच आणि गाव विकास समिती यांच्या प्रयत्नांनी स्वदेश फाउंडेशन मार्फत जामुंडे गाव प्रकाशाने उजळून निघाले असून प्रकाशाची नवी वाट मिळाली आहे.

जामुंडे गावातील काळाकुट्ट अंधार दूर करण्यासाठी मानवेढे जामुंडे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच मनोहर वीर, उपसरपंच भाऊराव ज्ञानेश्वर भागडे व गाव विकास समिती यांनी स्वदेश फाउंडेशनकडे पाठपुरावा केला होता.

सौरऊर्जेवर आधारित पथदीप आणि घरोघरी सौर ऊर्जा आधारित उपकरण बसवणारे जामुंडे हे गाव नाशिक जिल्ह्याच्या अतिदुर्गम आदिवासी भागातील पहिलेच गाव आहे. जामुंडे येथे घरोघरी सौर दिवे आणि चौकाचौकात सौर पथदीप लोकार्पण कार्यक्रम झाला. या वेळी सर्व गावात स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

या प्रसंगी, स्वदेस आरोग्य विभाग डायरेक्टर डॉ. अजितकुमार सूडके, तालुका व्यवस्थापक योगेश तोथरे, डॉ. सचिन अहिरे, काशिनाथ आगिवले, हरिभाऊ डोके, भास्कर डोके, मोहन मनोहर, हिरामण डोके, संतू डोके, विलास डोके, नेमीनाथ डोके आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

जामुंडे गाव डोंगराळ आणि जंगली भागात असल्यामुळे रात्री साप, विंचू, सरपटणारे विषारी प्राणी व बिबट्यासारख्या हिंस्र व वन्य प्राण्यांच्या भीतीने रात्री घराबाहेर पडता येत नव्हते. रात्रीच्या अंधारात विद्यार्थ्यांना नीट अभ्यासही करता येत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते.

"प्रत्येक घरात दर्जेदार सौर दिवे, प्रत्येक गल्लीत मुबलक सौर पथदीप बसवण्यात आले आहेत. यामुळे आदिवासी नागरिकांना जीवनात प्रकाशाची नवी वाट मिळाली आहे." भाऊराव भागडे, उपसरपंच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT