दोंडाईचा (धुळे) : मालपूर (ता. शिंदखेडा) येथील अमरावती धरणातून (Amaravati dam) विखरण तलावात पाणी सोडण्यास येथील शेतकरी ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. धरणाचे कालवे सक्षम नसल्याने नाहक पाण्याची नासळी करू नये अन्यथा शेतकरी (Farmer) ग्रामस्थ आंदोलनाचा पवित्रा घेतील असे पत्र ग्रामपंचायतीने पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिले आहे. (dhule news amaravti dam water lavel low)
जिल्हाधिकारी यांनी अमरावती धरणातील शिंदखेडा तालुक्यातील अकरा गावांसाठी ५६.९३ दलघफुट पाण्याचे आवर्तन सोडण्यासाठी कार्यकारी अभियंता धुळे पाटबंधारे विभागाला आदेश दिले आहेत. प्रत्यक्ष टंचाईची गाव आहेत का? अशा गावांची पाहणी करून संबंधित विभागाने पाणी सोडावे असेही ग्रामपंचायतीने दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
कालव्यांना गळती
धरणात केवळ ३७ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. भर पावसाळ्यात विखरण तलावात पाणी सोडले होते तेव्हा पोहचले नाही तर आता कसे पोहचणार आहे. असा सवाल येथील शेतकरी, ग्रामस्थांनी उपस्थितीत केला आहे. अमरावती मध्यम प्रकल्पात तब्बल ४० वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर येथील शेतकऱ्यांना पाणी पहावयास मिळाले. २००६ मध्ये धरणाचे काम पूर्ण झाले त्यावेळेस धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यानंतर गेल्या वर्षापासून धरण निसर्गाच्या कृपेने पूर्ण क्षमतेने भरत आहे. २६०६ हेक्टर जमीन सिंचन करण्याचे उद्दिष्ट आहे. धरणावर डावा आणि उजवा असे दोन कालवे आहे. या कालव्यांना अनेक ठिकाणी गळती आहे. बहुतांश ठिकाणांच्या उपचारींचे पाणी बंद करण्यासाठी व्हिल, रॉड तुटलेले आहेत. अनेक ठिकाणी उतार नसल्याने पाणी साचते. त्यामुळे पाणी वाया गेले असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. जो पर्यंत कालव्यातून एक्सप्रेस पद्धतीने पाणी पुढे जात नाही तोपर्यंत पाणी सोडले जाऊ नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
धरणात केवळ ३७ टक्के साठा
उजव्या कालव्यातून लाभ क्षेत्राबाहेरील धरणाचे खालील बाजूकडे तलावात पाणी सोडण्यासाठी ५.७२ दलघमी पाणीसाठ्याची तरतूद आहे. या कालव्याची सुरुवातीची लांबी साडेसात किलो मीटर आहे. तसेच वाढीव सात किलोमीटर अशी एकूण पंधरा किलोमीटर आहे. तेव्हा विखरण, मेथी, कामपूर, अंजनविहिरे आदी गावांना लाभ होऊ शकतो. येथे पाणी घेऊन जाण्याचा प्रयोग भर पावसाळ्यात धरण पूर्ण क्षमतेने भरले असताना लोकप्रतिनिधी, संबंधित विभागाने करून पाहिला होता. तरी देखील त्यावेळी थेट पाणी पोहचले नाही. आता धरणात फक्त ३७ टक्के साठा आहे. जर का पाणी सोडले. तर आरक्षित पाण्याचा साठा विखरण तलावापर्यंत पोहचत नाही तोवर संपलेला असेल. म्हणून पाणी वाया घालवू नये अशी मागणी करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.