suicide case suicide case
उत्तर महाराष्ट्र

मोबाईल जास्त खेळू नको..सांगितल्याचा राग; मुलाने रूममध्‍ये जात घेतला गळफास

मोबाईल जास्त खेळू नको..सांगितल्याचा राग; मुलाने रूममध्‍ये जात घेतला गळफास

सकाळ डिजिटल टीम

धुळे : शहरात बारावीत शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास (Suicide case) लावून आत्महत्या केली. ओम राजेंद्र झांबरे (वय १८, रा. गल्ली नं. ४, राजकमल चित्रमंदिरच्या मागे, धुळे) असे त्याचे नाव आहे. वडिलांनी मोबाईल जास्त खेळू नको’, (Mobile game) असे सांगितल्याचा राग आल्याने ओम याने हे टोकाचे पाऊल उचलले. तो देवपुरातील महाविद्यालयात बारावी कॉमर्सचे शिक्षण घेत होता. (boy suicide don't play mobile too much anger of being told)

वडील राजेंद्र झामरे हे घराबाहेर जात असताना ओम हा मोबाईल घेऊन बसला होता. तो जास्त वेळ खेळू नको, असे वडिलांनी त्यास सांगितले. त्याचा राग आल्याने तो रागात खोलीत गेला व दरवाजा बंद करून गळफास घेऊन सकाळी अकराच्या सुमारास जीवनयात्रा संपवली. काही वेळाने त्याची बहीण श्वेता हीने आवाज देऊनही ओम याने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे इतर कुटुंबीयांनी धाव घेतली.

दरवाजा तोडल्‍यावर बसला धक्‍का

दरवाजा तोडल्यावर ओम हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. कुटुंबीय व शेजाऱ्यांनी ओम याला हिरे रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉ. कपिल पावरा यांनी तपासणी करून मृत घोषित केले. दुपारी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. राजेंद्र विजय झामरे यांनी दिलेल्या माहितीवरुरून आझादनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. दरम्यान, ओम हा एकुलताच मुलगा होता. त्याचे वडील व्यावसायिक आहेत. वडिलांना व्यवसायात मदत व्हावी, याच उद्देशाने त्याने कॉमर्स घेतले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार! 'वर्षा' निवासस्थानातून मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर

Shahajibapu Patil: काय झाडी काय डोंगर... फेम शहाजीबापू पाटील यांचा पराभव करणा-या युवा आमदाराने केली अनोखी घोषणा

Trending News: ओला स्कूटरमध्ये झाला बिघाड, दुरुस्तीसाठी लागले 90 हजार, तरुणाने हातोड्यानेच फोडली स्कूटर, पहा व्हिडिओ

Sharad Pawar : राज्यामध्ये लागलेला निकाल अनपेक्षित आहे

Latest Maharashtra News Updates : थोड्याच वेळात शिवसेनेचा नेता निवडला जाणार

SCROLL FOR NEXT