corona death funeral 
उत्तर महाराष्ट्र

ना रक्‍ताचे नाते..ना ओळख; तरीही अंतिम संस्‍कारासाठी पुढाकार

जगदीश शिंदे

साक्री (धुळे) : कोरोनाग्रस्त रुग्णांचे निधन होण्याचे प्रमाण साक्री तालुक्यात वाढत असून, मृत रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठीचे मोठे धारिष्ट्य मृत व्यक्तीचे नातेवाईक तथा समाजातील धुरीणांना करावे लागत आहे. अशीच घटना बुधवारी (ता. ३१) तालुक्यातील निजामपूर येथे घडली. हिंदू कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर मुस्लिम समाजातील युवकांनी अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेत हिंदू-मुस्लिम सलोख्याचे अनोखे उदाहरण समाजासमोर ठेवले. 
साक्री तालुक्यातील निजामपूर येथील निवृत्त पोस्टमन महारू भटू कुंवर यांचे कोरोनाने भाडणे कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू असताना निधन झाले. कर्मचाऱ्यांच्या तोकड्या संख्येअभावी पुढील सोपस्कार पार पाडण्याविषयी असमर्थता पुढे आल्याने सामाजिक बांधिलकी म्हणून मुस्लिम समाजातील तरुणांनी अंत्यविधीसाठी पुढाकार घेतला. यासाठी विशेष प्रयत्न करणारे ग्रामपंचायत सदस्य ताहीर बेग मिर्झा, मुश्ताक खान पठाण, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बच्छाव यांच्या मदतीने मुस्लिम तरुणांनी अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले. यात अल्तमश शौकत सय्यद, नदीम इब्राहिम सय्यद, राकेश शिंदे यांनी सर्व अंत्यविधीचे सोपस्कार केले. या वेळी मुजम्मील मिर्झा, परवेज सय्यद, सादिक शेख, साहिल सय्यद, सज्जाद मिर्झा, अबरार सय्यद, राजिक मिर्झा, तौफीक सय्यद, किशोर वाघ, दीपक मोरे, पीयूष ठाकरे आदी उपस्थित होते. या वेळी मृत कुवर यांचा मुलगा गोकुळ कुवर यांनी अग्निडाग दिला.

गांभीर्य नाहीच 
कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने साक्री तालुक्यातही थैमान घातले असून, तालुक्यात दर दिवशी शेकडोवर नागरिकांना कोरोनाची बाधा होत असल्याचे आकडेवारीवरून दिसते आहे. प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले असले तरी नागरिक मात्र अद्यापही विषयाचे गांभीर्य समजून घेत नसल्याचे चित्र शहरात होणाऱ्या गर्दीवरून स्पष्ट होत आहे. जनतेने अशीच बेपर्वाई सुरू ठेवल्यास रुग्णसंख्येत अजून मोठ्या प्रमाणात वाढ होईल. परिणामी आरोग्यसेवेवर याचा ताण वाढेल व पर्यायाने लॉकडाउनसारखे टोकाचे पाऊल प्रशासनास उचलावे लागेल हे मात्र निश्चित. 
 
भाडणे येथेही युवकांचा पुढाकार 
भाडणे (ता. साक्री) गावातील कोरोनाबाधित रुग्णाचे कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरू असताना निधन झाले. मात्र कुणीही नातेवाईक जवळ नसल्यामुळे अंत्यसंस्काराचा मोठा प्रश्न उभा राहिला. पार्थिव घेऊन जाण्यासाठी ट्रॅक्टर उपलब्ध झाला, मात्र चालक उपलब्ध होत नव्हता. अशा वेळी भाडणेचे माजी उपसरपंच योगेश सोनवणे यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत पार्थिव अंत्यसंस्कार स्थळी नेले. या वेळी पोलिसपाटील योगेश खैरनार, आकाश देशमुख, बंडू सोनवणे यांनी पुढाकार घेत मृतावर अंत्यसंस्कारासाठी सहकार्य केले. 

संपादन- राजेश सोनवणे
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT