धुळे : नवजात बालक आईचा स्पर्श ओळखते अन् कोणी घेतल्यानंतर रडणारे बाळ आईच्याच कुशीत शांत होवून झोपी जाते. पण आईच्या कुशीतही रडणारे बाळ जेव्हा डॉक्टरांनी हातात घेत त्याला गाणे म्हटले. अन् जोरात रडणारे हे बाळ अवघ्या काही वेळातच झोपी गेल्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. (Doctor Abhinay Darwade sings lullaby for baby to go to sleep viral video on social media)
कोरोना संकटाच्या काळात आशेचा किरण दाखविणाऱ्या डॉक्टरांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धुळ्यातील बालरोगतज्ज्ञ डॉ. अभिनय दरवडे (Dr.Abhinay Darwade, Pediatrician in Dhule)यांचा हा व्हिडीओ आहे. अशा प्रकारे रडणाऱ्या बाळाला गाणे म्हणून शांत करण्याचा त्यांचा पहिलाच प्रसंग नसून, मागील आठ वर्षांपासून डॉ. दरवडे हे काम करत आहेत. यामुळे हा एक त्यांच्यासाठी सवयीचा भाग बनला आहे.
ते बाळ पाच दिवसांचेच
नवजात बालकाला गाणे म्हणून झोपविण्याचा हा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर टाकल्यानंतर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यांच्या रुग्णालयात जन्माला आलेल्या बाळाचे वजन केवळ ९०० ग्रॅम होते. त्या बाऴाला ऑक्सिजन देखील लावण्यात आलेला होता. बाळाला झोप येत नव्हती. पाचव्या दिवशी ऑक्सिजन काढल्यानंतर बाळाने आईचे दूधही प्यायले. यामुळे थोडी ताकद आल्याने बाळाचा आवाज निघाला आणि ते रडू लागले.
डॉक्टरांच्या गाण्याने झाले शांत
बराच वेळ झाला तरी ते बाळ रडण्याचे थांबत नव्हते. आजूबाजूच्या बाळांनाही त्याचा त्रास जाणवू लागला होता. अशावेळी डॉ. दरवडे यांनी बाळाला केबिनमध्ये नेत हाताचा झोका करत त्याला शांत करण्यासाठी गाणी गायली. यानंतर बाळ शांतपणे गाणी ऐकता ऐकताच झोपून गेले.
यापुर्वी बाळाचा २५ दिवस सांभाळ करुन ठेवले नाव
डॉ. अभिनव दरवडे यांनी बाळाला शांत करण्यासाठीचा त्यांचा गाणे म्हणण्याचा पहिलाच प्रसंग नसून, मागील आठ वर्षांपासून ते हे काम करत आहेत. यात पाच वर्षांपुर्वी वजनाने कमी असलेल्या बाळाचा सांभाळ २५ दिवस डॉ. दरवडे यांनी केली. इतकेच नाही तर त्या बाळाचे नामकरण करत ‘अवधुत’असे नाव डॉ. दरवडे यांनी ठेवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.