fraud examinees 
उत्तर महाराष्ट्र

तलाठी परीक्षेला तोतया परीक्षार्थीं; १९ महिन्यांनंतर उघड आणि गुन्हा दाखल

विजयसिंग गिरासे

चिमठाणे (धुळे) : नगर जिल्ह्यातील तलाठी संवर्गातील ८४ रिक्त पदे भरण्यासाठी १९ जुलै २०१९ ला झालेल्या परीक्षेत तोतया उमेदवारांनी परीक्षा दिल्याच्या तक्रारीवरून तब्बल १९ महिन्यांनंतर बुधवारी (ता. १७) शिंदखेडा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 
महापरीक्षा पोर्टलमार्फत ऑनलाइन पद्धतीने चिमठाणे (ता. शिंदखेडा) केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली. त्यात विकी लिंबाजी खरात या नावाने अर्ज करताना अपलोड केलेला फोटो, अर्जावरील स्वाक्षरी व परीक्षा केंद्रात हजेरीपटावरील स्वाक्षरी यात तफावत असल्याचे पडताळणीदरम्यान निदर्शनास आले होते. त्यावरून नगर येथील महसूल विभागाच्या तहसीलदार माधुरी आंधळे यांनी तेथील कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. ती शून्य क्रमांकाने बुधवारी शिंदखेडा पोलिस ठाण्यात वर्ग झाली असून, त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, यामागे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची चिन्हे आहेत. 

७ नोव्हेंबरला पडताळणी
तहसीलदार आंधळे यांनी ९ मार्चला नगर येथील कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की या परीक्षेनंतर सर्व सोपस्कार पार पाडून उमेदवारांची प्रारूप यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. यादीत नावे असलेल्या उमेदवारांना ३ ते ७ जानेवारी २०२० या कालावधीत मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बोलावले होते. मात्र, पडताळणीवेळी शंकास्पद बाबी आढळून आल्याने उमेदवारांचे परीक्षा केंद्रावरील पुरावे, अभिलेख महापरिका पोर्टलकडून मागविण्यात आले. त्यानुसार उपलब्ध झालेले एकूण ९९ उमेदवारांचे प्रवेशपत्र, परीक्षा केंद्रावरील हजेरीपट व परीक्षा केंद्रावर उमेदवारांचा घेण्यात आलेल्या फोटोंची ७ नोव्हेंबर २०२० ला पडताळणी केली. 

दहा जणांच्या संशयास्‍पद बाबी
पडताळणीत दहा उमेदवारांच्या संदर्भात संशयास्पद बाबी निदर्शनास आल्या आहेत. विकी खरात (वय २६, रा. सागरवाडी, पो. लाडसांगवी, ता. बदनापूर, जि. जालना) याने चिमठाणे येथील केंद्रावर आपल्या जागी तोतया उमेदवारास बसवून ऑनलाइन परीक्षा दिल्याचे निष्पन्न झाले. त्या माध्यमातून या दोघांनी शासनाची फसवणूक केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला असून, पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली चिमठाणे पोलिस दूरक्षेत्राचे हवालदार प्रभाकर सोनवणे तपास करत आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT