न्याहळोद (धुळे) : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने जिल्ह्याचे वातावरण ढवळून निघाले आहे, त्याअनुषंगाने कापडणे जिल्हा परिषद गट व न्याहळोद पंचायत समिती गण साठी इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून प्रत्यक्ष गाठीभेटी यांवर भर दिला जात आहे.
जिल्हा परिषदेच्या पंधरा गट व तीस गणासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत विविध गटात व गणात मोर्चे बांधणीसाठी सुरुवात केली असून गाठीभेटीवर जोर दिला जात आहे. कापडणे गटातील व न्याहळोद गणातील आरक्षण ओबीसी वगळून खुला करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात झालेल्या निवडणुकीत जिल्हा परिषद गटासाठी माजी कृषी सभापती बापू खलाणे पंचायत समिती न्याहळोद गणासाठी विकास पवार हे विजयी उमेदवार पुन्हा रिंगणात उतरणार आहेत. भाजपतर्फे दोघही उमेदवारांची निवड जवळ जवळ निश्चित झाली असून महाविकास आघाडीतर्फे किरण पाटील, अंजन पाटील, किंवा मोटाभाऊ यांच्यापैकी कुणाची तरी वर्णी लागणार आहे. अपक्षमधून गटासाठी धनुरचे महेश बोरसे, कपडण्याचे दिनकर माळी, न्याहळोद मधून परमेश्वर माळी हे देखील इच्छुक आहेत, तसेच पंचायत समिती गणासाठी विकास आघाडीतर्फे उपसरपंच योगीराज (अप्पा) पवार, प्रकाश वाघ उपाध्ये गटामार्फत भास्कर माळी प्रताप माळी, विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन उमेश पवार, तसेच आदी इच्छुक आहेत.
वर्षभरात झालेल्या निवडणुकीत पराभूत उमेदवारांची मानसिकता दिसून येत नसल्याने त्यांचे समर्थन कोणत्या गटाला जाते हे देखील महत्त्वाचे आहे. नवीन उमेदवारांना कार्यकर्त्यांची मनधरणी व त्यांना विश्वासात घेण्यासाठी दमछाक होणार आहे. जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे किरण पाटील व भाजपचे बापू खलाने हे दोघे देखील धुळे येथे स्थायिक आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी कृषी सभापती किरण पाटील यांचा देखील मोठ्या प्रमाणात तरुण वर्गाशी संपर्क असून त्यांच्या व्यक्तिगत सबंध व विकास कामांच्या जोरावर ही लढत अटीतटीची होईल असे चिन्ह दिसत आहे. किरण पाटील यांचा राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार, जयवंत पाटील यांच्याशी निकटचे सबंध असून मतदार संघातील विकास कामांना त्यामुळे चालना मिळेल अशी परिसरात चर्चा सुरू झाली आहे. कापडणेचे दिनकर माळी हे देखील बऱ्यापैकी मतदान खाणार असल्याचे जाणकार सांगतात.
न्याहळोद पंचायत समितीसाठी न्याहळोद, कौठळ, तामसवाडी, धनुर, लोनकुटे ही गावे असून यासाठी भाजपतर्फे विकास पवार यांचे नाव जवळजवळ निश्चित झाले असले तरी त्यांच्या विरोधात प्रबळ उमेदवार शोधण्याची आघाडीची धडपड चालू आहे, त्यात प्रामुख्याने भास्कर माळी, प्रकाश वाघ, कीर्तिवंत कौठळकर, चेतन पाटील, उपसरपंच योगीराज (अप्पा) पवार, उमेश पवार, नाना माळी, आदी इच्छुक असल्याचे चर्चिल्या जात आहे.
संपादन- राजेश सोनवणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.