bird flu 
उत्तर महाराष्ट्र

इथे उद्‌भवली २००६ ची पुनरावृत्‍ती अन्‌ व्यवसाय डबघाईला 

विनायक सुर्यवंशी

नंदुरबार : पोल्ट्रीफार्मच्या पक्ष्यांचा मृत्यू कोणत्या आजाराने होतो; याचे निदान वेळेवर न झाल्याने म्हणा किंवा समजून ना समजपणा केला असे म्हणा. मात्र याचे परिणाम किती भयंकर होतात हे दुसऱ्यांदा नवापूरचे कुक्कुटपालन व्यावसायिक बर्ड फ्लू या संसर्गजन्य आजाराच्या माध्यमातून अनुभवत आहेत. आतातरी व्यावसायिकांनी आणि पशुसंवर्धन विभागाने दक्षता घेतली पाहिजे. या प्रकरणात व्यावसायिकांसोबत शासनालाही आर्थिकदृष्ट्या नुकसान होते. जिल्हा व राज्यातील प्रशासन सर्व नित्यवर्किंग सोडून घटनास्थळी ठाण मांडून बसले आहेत. 
रोज सरासरी प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात पोल्ट्रीफार्मच्या कोंबड्यांचा मृत्यू होतो. हे समजूनही पुन्हा दुर्लक्ष करत हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून परस्पर पक्ष्यांची विल्हेवाट लावली. मात्र कोंबडं कितीही काळ झाकून ठेवलं तरी ते बांग दिल्याशिवाय राहत नाही. हे कोंबड्या पालनकर्तेच विसरल्याचे वाटते. दुर्लक्ष केल्याचा परिणाम तालुक्यातील २७ पोल्ट्री व्यावसायिकांना भोगावा लागणार आहे. 

एकाची चूक अन्‌ सर्वांना भुर्दंड
एकाची चूक ही सर्वांना किती महागात पडते यापेक्षा अजून दुसरे मोठे कुठलेही उदाहरण असू शकत नाही. कुक्कुटपालनाचा सर्वांत मोठा व्यवसाय डबघाईला जाण्याच्या उंबरठ्यावर आहे. कोंबड्यांच्‍या मृत्यूबाबत प्रशासनाला माहिती दिली असती तर आज ही परिस्थिती उद्‍भवली नसती. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले नसते, असेही काही जाणकारांचे मत आहे. 

आता पुन्हा तारेवरची कसरत
पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांना याबाबत पोल्ट्री व्यावसायिकांना सविस्तर माहिती द्या, असे निर्देश द्यावे लागतात. पोल्ट्रीफार्ममध्ये जैव सुरक्षेबाबत मार्गदर्शक सूचनेनुसार उपाययोजना होत असल्याची खात्री झाली पाहिजे. यात कोणा एकाला दोष देऊन चालणार नाही. शासनाकडून भरपाई मिळेल मात्र त्याच्याने पुन्हा व्यवसाय सुरू होऊ शकत नाही. कुक्कुटपालनाचा व्यवसाय पूर्ववत स्थितीत आणण्यासाठी पुन्हा या व्यावसायिकांना तारेवरची कसरत करावी लागेल, तेव्हाच हा व्यवसाय पुन्हा उभा राहू शकेल. २००६ प्रमाणे ज्या व्यावसायिकांनी हिंमत ठेवत आत्मविश्वासाने व्यवसाय उभा केला. ज्यांची हिंमत झाली नाही त्यांनी कायमचा त्यांच्या व्यवसायापासून हात धुऊन बसले. कुक्कुटपालन व्यावसायिकांना सदैव सतर्क राहणे अपेक्षित आहे. 
 
२००६ ची पुनरावृत्ती 
२००६ मध्ये राज्यातील सर्वाधिक अंडी उत्पादन करणारा नवापूर तालुका होता. सर्वाधिक पोल्ट्रीफार्म व्यवसाय नवापूर शहर व आजूबाजूच्या परिसरात होता. ३५ वर कुक्कुटपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर होते. मात्र बर्ड फ्लू या आजाराने सर्व उद्ध्वस्त केले. आज पंधरा वर्षांनंतर तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पंधरा वर्षांच्या कार्यकाळात व्यवसाय पुन्हा उभारीला येत असताना ही दुर्घटना घडली.  

संपादन ः राजेश सोनवणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly: आला, आला, आला...पाटील आला! सरकार कुणाचेही असो; रुबाब 'पाटलां'चाच! राज्यातून २४ 'पाटील' पोहोचले विधानसभेत

SMAT 2024-25: कॅप्टन श्रेयस अय्यर-ऋतुराज गायकवाड येणार आमने-सामने; मुंबई-महाराष्ट्र संघात आज लढत

सातारा जिल्ह्यातील नेत्यांच्या मुंबईत गाठीभेटी; महायुतीच्या आमदारांसोबत उदयनराजेंनी घेतली फडणवीस, पवारांची भेट

IND vs AUS 2nd Test: रोहित आला पण... टीम इंडियाचा युवा फलंदाज दुसऱ्या कसोटीला मुकणार, दुखापतीचे ग्रहण

Latest Marathi News Updates: अंधेरी परिसरात इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल

SCROLL FOR NEXT