corona vaccination corona vaccination
उत्तर महाराष्ट्र

नंदुरबार जिल्ह्यात लसीकरणाचा ओलांडला दोन लाखांचा टप्पा

नंदुरबार जिल्ह्यात लसीकरणाचा ओलांडला दोन लाखांचा टप्पा

सकाळ डिजिटल टीम

नंदुरबार : आदिवसी बहूल जिल्हा त्यातच अंधश्रध्देचा पगडा आणि लसीमुळे मृत्यूची पसरलेली अफवा यावर जनजागृती करीत आरोग्य विग, शिक्षक, अंगणवडी व आशा वर्कर यांच्या प्रयत्नांनी जिल्ह्यात कोरोना (Nandurbar corona update) लसीचे दोन लाख डोस देण्यात आले आहेत. त्यापैकी १ लाख ६० हजार ६३२ व्यक्तींना पहिला डोस तर ४० हजार ७९२ व्यक्तींना दुसरा डोस (Corona vaccination) देण्यात आला आहे. (nandurbar district cross two lakh corona vaccination)

जिल्ह्यात १६ जानेवारीला पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयात लसीकरणाचा शुभारंभ झाला.त्या दिवशी ४ केंद्रांवर २६५ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले होते. तर १२ मेस ७० शासकीय केंद्रांवर ६ हजार ६२५ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले.

पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. नंतरच्या टप्प्यात कोरोना नियंत्रणासाठी काम करणारे कर्मचारी (फ्रंट लाईन वर्कर) आणि ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण केले.जिल्ह्याने २२ एप्रिलला लसीकरणाचा एक लाखाचा टप्पा पूर्ण केला. पालकमंत्री पाडवी यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत: लस घेऊन नागरिकांना लसीकरणासाठी आवाहन केले.

गैरसमज दूर करण्यात यश

नागरिकांच्या मनामध्ये लसीकरणाविषयी अनेक गैरसमज असल्याने प्रशासनाने जनजागृतीवर विशेष भर दिला आहे. ग्रामीण भागातील लसीकरणासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली. या मोहिमेत शिक्षकांची भूमिका महत्वाची ठरली आहे. ग्रामीण भागातील जनजागृतीसह लाभार्थ्यांच्या नोंदणीचे कामदेखील शिक्षकांकडून करण्यात येत आहे. नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी लोककला, स्थानिक भाषा, बैठका, घरोघरी भेटी आदी विविध माध्यमांचा उपयोग करण्यात येत आहे.

नोंदणी झालेल्या गावात लसीकरणासाठी फिरते पथक पाठवून शिबिरांच्या आयोजनाद्वारे लसीकरणाला गती देण्याचे यशस्वी ठरले आहेत. यासाठी प्रशासनाने प्रत्येक तालुक्यासाठी दोन आणि अक्कलकुवा व धडगावसाठी चार वाहनांची सुविधा उपलब्ध करून दिली. आरोग्य विभागाचे कर्मचारी लसीकरणासाठी विशेष परीश्रम घेत आहेत. ग्रामस्तरावरील मुख्याध्यापक, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका आदींचा सहभागही महत्वाचा ठरला.

उद्दीष्टाच्या ११.२ टक्के लसीकरण

जिल्ह्यात १३ हजार ६६५ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला तर ७ हजार ७२० कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. १० हजार ५३६ फ्रंट लाईन वर्कर्सनी पहिला तर ८हजार ८४३ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. १८ ते ४४ वयोगटातील १४ हजारपेक्षा अधिक व्यक्तींनी पहिला डोस घेतला आहे. तर ४५ वर्षावरील १ लाख १० हजार ७८६ व्यक्तींनी पहिला तर २४ हजार २३४ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे.

तीन टक्‍केच लोकांचा दुसरा डोस

एकूण उद्दीष्टाच्या ११.२ टक्के लाभार्थ्यांनी पहिला तर २.८० टक्के लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. शुक्रवारपासून दुसरा डोस घेण्यासाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील लसीकरण मोहिमेलादेखील अधिक गती देण्यात येणार आहे.

आतापर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांना कुठलाही गंभीर त्रास झालेला नाही. लसीकरण पूर्णपणे सुरक्षित आहे. कोरोना नियंत्रणासाठी लसीकरण अत्यंत आवश्यक असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करून घ्यावे.

- डॉ.राजेंद्र भारुड, जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : मविआचा विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव का झाला? शरद पवार यांनी सांगितली 'ही' कारणं

Latest Maharashtra News Updates : विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर शरद पवारांची पत्रकार परिषद

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: ऋषभ पंत, श्रेयस अय्यर इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू! जाणून घ्या पहिल्या सत्रात कोणाला लागल्या बोली

Daund Assembly Election 2024 Result : दौंड विधानसभा निवडणुकीत एकाच कुटुंबात विजयाच्या दोन हॅटट्रीक; कुल पिता-पुत्रांसाठी जनादेश

Junior National Kho Kho Championship स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर; भरतसिंग वसावे आणि सुहानी धोत्रे कर्णधार

SCROLL FOR NEXT