covid free  covid free
उत्तर महाराष्ट्र

आशादायक..नंदुरबार जिल्ह्यात ३१६ गावे कोरोनामुक्त

आशादायक..नंदुरबार जिल्ह्यात ३१६ गावे कोरोनामुक्त

सकाळ डिजिटल टीम

नंदुरबार : जिल्ह्यातील ५९५ ग्रामपंचायतींपैकी आत्तापर्यंत टप्याटप्याने ३१६ ग्रामपंचायती कोरोनामुक्त (corona free) झाल्या आहेत. या गावांमध्ये आजमितीस कोरोना संसर्गाचा एकही रुग्ण नाही. या सर्व गावांमध्ये ग्रामस्थांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी केली आहे. निम्‍म्यापेक्षा जास्त ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यासाठी आशादायक बाब आहे. जिल्हा कोरोना मुक्तीचा (Nandurbar corona update) उंबरठ्यावर आल्याचे चित्र आहे. (nandurbar district villages corona free in last week)

गेल्या १५ महिन्यांत नंदुरबार जिल्हा कोरोना संसर्गाने होरपळून निघाला होता. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड व जिल्ह्यातील सर्वच अधिकाऱ्यांचे योगदान, योग्य नियोजन, आरोग्य व पोलिस विभागाने घेतलेली अहोरात्र मेहनतीमुळे १५ महिन्यानंतर का होईना, मात्र जिल्ह्यासाठी आशादायक चित्र आहे. अखेर जिल्हा प्रशासन व आरोग्य आणि पोलिस प्रशासनाच्या परिश्रमाला व नागरिकांनी वेळोवेळी शासन-प्रशासनाने केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचेच अखेर हे फलित आहे.

अनेक गावांनी रोखले वेशीवरच

मार्च २०२० पासून जिल्ह्यात कोरोना संसर्गाला सुरुवात झाली असली तरी किमान तीन महिने जिल्ह्यात कोरोनाला शिरकाव करण्यापासून प्रशासनाने व ग्रामस्थ आणि नागरिकांनी रोखले होते. मात्र कोरोना काळात बाहेरगाव प्रवास करणारे व स्थलांतरित अथवा काम -धंदा, नोकरी निमित्त बाहेर गेलेल्या नागरिकांचे गावाकडे आगमन होऊ लागल्याने जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला होता. मात्र प्रशासनाचा सर्जकतेमुळे व वेळीच योग्य नियोजन केल्यामुळे कोरोनाचा उद्रेक नंदुरबार व शहादा शहर वगळता तीव्र प्रमाणात कुठेही दिसून आला नव्हता. अनेक गावांनी तर कोरोनाला वेशीबाहेरच रोखण्यात यश मिळविले होते.

दुसऱ्या लाटेचा उद्रेक

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मार्च व एप्रिल २०२१ हे दोन महिने अत्यंत जिकरिचे गेले. या दोन महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक तीव्र व जलद गतीने वाढला. त्यावेळी प्रशासनही हादरले होते. आरोग्य यंत्रणा, नियोजनाचाही अभाव काही प्रमाणात दिसून आला. मात्र प्रशासनाने वेळीच सतर्कता राखली त्यामुळे दोन महिन्यानंतर हळूहळू कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली. त्यात २१ एप्रिल २०२१ पूर्वी टप्या टप्याने २२७ गावे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर आजअखेर पुन्हा ८९ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. म्हणजेच ५९५ पैकी ३१६ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्याने निम्मेवर जिल्हा कोरोनाला हद्दपार करण्यात यशस्वी ठरला आहे. शहरी भागातील गावांमध्ये मात्र अद्याप ठाण मांडून बसलेला कोरोनाशी नागरिक, आरोग्य विभाग व प्रशासन लढा देत आहे. मात्र तेथीलही रुग्ण संख्या दिवसागणिक घटत आहे.

२१ एप्रिल ते १२ मे पर्यंत कोरोनामुक्त झालेली गावे

तालुका....बाधीत गावे.... कोरोनामुक्त गावे

नंदुरबार...... ११२......... ३२

नवापूर......... ८५......... २१

शहादा......... ८५......... १८

तळोदा........ ४३.......... ०७

अक्कलकुवा.. २८......... ०६

धडगाव....... १५.......... ०५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT