तळोदा (नंदुरबार) : तळोदा शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या शेत शिवारात बिबट्याचा (leopard) मुक्त वावर वाढला असून दररोज शेतकऱ्यांना (Farmer) पायाचे ठसे किंवा बिबट्याचे दर्शन होत आहे. सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असताना शेत शिवारात शेतकऱ्यांना जाणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे वन विभागाने (Forest department taloda) तत्काळ कारवाई करून तळोदा शिवारात पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (taloda-aria-Fear-of-leopard-free-movement)
शहराच्या आजूबाजूच्या शेतशिवारात बिबट्याचा मुक्त संचार दिसून येत आहे. सुशीला पार्क या मानवी वस्तीच्या जवळील जितेंद्र सूर्यवंशी यांच्या शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळलेत तर मोहन माळी यांच्या शेतातही पायाचे ठसे दिसून आले. त्यात मोठे आणि लहान असे ठसे आहेत. त्यामुळे मादी व तिचे पिलू असा वावर असल्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे दोनच दिवसांपूर्वी शहरातील शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या कळपातील दोन शेळ्या उंडवा नाला परिसरातून बिबट्याने उचलून नेल्या तर भवर शिवारातील पोलीस पाटील जयेंद्र मगरे यांच्या शेतातील गायीच्या वासरूला बिबट्याने मानेजवळ पकडून जखमी केल्याची घटना घडली आहे.
बिबट्याच्या पाऊलखुणा
दररोज कुठे ना कुठे बिबट्याच्या पाऊलखुणा दिसून येत आहेत. त्यात शेतकर्यांना शेत शिवारात जाणे अडचणीचे ठरत आहे. सध्या शेतकऱ्यांची खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. रात्री-अपरात्री बोअरवेलच्या वीज पुरवठा सुरु करण्यासाठी व पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात जावे लागत आहे. असे असताना बिबट्याच्या भीतीने शेतकऱ्यांचे नियोजन बिघडत आहे. त्यामुळे वनविभागाने एखाद्या शेतकऱ्यावर हल्ला होण्याची वाट न पाहता बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी तात्काळ कारवाई करावी व परिसरात पिंजरे लावावेत अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.