Teacher Teacher
उत्तर महाराष्ट्र

धुळ्यात शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती शाळेत अनिवार्य!

कोरोना परिस्थितीमुळे पुढील सूचना येईपर्यंत शाळा बंद आहेत.

तुषार देवरे



देऊर : धुळे जिल्हा परिषद (Dhule Zilla Parishad) शिक्षण विभागांतर्गत (Education Department)प्राथमिक शाळेतील शिक्षकांना (Teacher)दैनंदिन कामकाजासाठी शाळेत (School) ५० टक्के उपस्थिती आवश्यक आहे. तशी सूचना पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, महापालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्यांना (Municipal Corporation) पत्रान्वये देण्यात आली आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार (Education Officer Manish Pawar) यांनी दिली. (dhule district fifty percent attendance is compulsory in school)


२०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी जिल्ह्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना सुट्यांची निश्‍चिती करण्यासाठी गुरुवारी (ता. २४) शासनमान्य शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळेत १०० ऐवजी ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती हवी, अशी मागणी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने संचालकांच्या आदेशानुसार शिक्षण विभागाकडे केली होती. शासन मार्गदर्शक सूचना व शिक्षक संघटनेची मागणी लक्षात घेत शासनस्तरावरून पुढील आदेशापर्यंत ५० टक्के उपस्थिती शिक्षकांची राहणार आहे.

कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती
पहिली ते अकरावीपर्यंतच्या शिक्षकांना ५० टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. दहावी व बारावीच्या शिक्षकांना १०० टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. प्राथमिक, माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती बंधनकारक असल्याचे या वेळी सांगण्यात आले. बैठकीस प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार, उपशिक्षणाधिकारी मनीषा वानखेडे, गटशिक्षणाधिकारी सुरेखा देवरे, सी. के. पाटील, शिक्षण विस्ताराधिकारी अहिरे, साळुंखे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष शिवानंद बैसाणे, सुरेंद्र पिंपळे, भूपेश वाघ, संजय पोतदार, राजेंद्र पाटील, प्रवीण भदाणे, नवीनचंद्र भदाणे, राजेंद्र भामरे, उमराव बोरसे, बापू पारधी, बाळू पाटील, मनोहर शिंदे, शरद सूर्यवंशी, भगवंत बोरसे, साहेबराव गिरासे, चंद्रकला परदेशी, राजेंद्र सोनार, दत्तू पाटील, सुधीर सूर्यवंशी, दीपक पाटील, विकास गवळे आदी उपस्थित होते.

शाळेची वेळ सकाळी साडेसात ते साडेबारा
कोरोना परिस्थितीमुळे पुढील सूचना येईपर्यंत शाळा बंद आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण पुणे यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार ऑनलाइन व इतर माध्यमातून शाळांचे शिक्षण सुरळीतपणे सुरू राहणार याची दक्षता घ्यावी. जिल्हा परिषद शाळेत शेतकऱ्यांचे बहुतांश पाल्ये शिक्षण घेत आहेत. या पार्श्‍वभूमीवर दत्त जयंतीऐवजी पोळा सणाला सुटी घेण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत शाळेची वेळ सकाळी साडेसात ते साडेबारा राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT