धुळे : बुलेटमधून फटाक्यांचा (कर्णकर्कश) आवाज काढणाऱ्या बुलेटस्वारांवर (Bullet motorcycle) शहर वाहतूक शाखेने (Traffic police) पुन्हा कारवाईचा बडगा उचलला. काही दिवसांपूर्वीही पोलिसांनी अशी मोहीम हाती घेत बुलेटचे असे सायलेन्सर रोडरोलरखाली चिरडले होते.
गेल्या काही दिवसांपूर्वी शहर वाहतूक शाखेने फटाके फोडणाऱ्या बुलेटस्वारांवर कारवाई करून दंड वसुलीसह अशा सायलेन्सर, फॅन्सी नंबर प्लेटवर रोडरोलर फिरवला होता. त्यामुळे अशा बुलेटस्वारांना काही दिवस का होईना चाप बसला होता. दरम्यान आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा काही बुलेटस्वारांनी असे प्रकार सुरू केले आहेत. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने वाहतूक शाखेने पुन्हा कारवाई सुरू केली. सकाळी संतोषी माता चौकापासून कारवाईला सुरवात झाली. फटाकेबाज बुलेटधास्वारांसह डॉन, दादा, बाबा अशा नंबरप्लेट तसेच फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या बुलेटस्वारांना थांबवून त्याची चौकशी केली जात होती.
शहर वाहतूक शाखेने अचानक सुरू केलेल्या या कारवाईमुळे बुलेटस्वारांची पंचाईत झाली. मोटार वाहन कायद्याचा भंग करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू आहे.
पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्या आदेशाने व अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर विभाग) दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी धीरज महाजन, सहाय्यक पोलिस निरीक्षक संगीता राऊत, पोलिस उपनिरीक्षक श्री. जाधव, जितू आखाडे, मनोहर महाले, आरिफ शेख, सुधीर सोनवणे, रवी ठाकरे, उमाकांत खापरे, विवेक वाघमोडे, किशोर गायकवाड, राणी दामोदर, दीपिका वाघमोडे, दिनेश चौधरी, मतिन शेख, प्रसन्न पाटील, दीपक दामोदर, शेखर मन्सूरी, किरण मेहरूनकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली. वाहतूक शाखेतर्फे ही कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.