म्हसदी : दसऱ्यानिमित्त (Dussehra) सामुदायिक सीमोल्लंघनानंतर शुक्रवारी सायंकाळी येथे मेळावा झाला. सुमारे चाळीस वर्षांपासून ही परंपरा (Tradition) आहे. विजयादशमीला (Vijayadashami) गाव विकासासाठी सारे गाव एकत्र येणारे म्हसदी एकमेव असावे. सभेत ओला दुष्काळ जाहीर करा, पिक विमा (Crop Lone) मिळावा, गावातील रस्ते दुरस्त व्हावेत, गाव स्वच्छ राखावे, जेष्ठ नागरिकांच्या समस्या, बाजार ओटे, सिंगल फेज योजना व अक्कलपाडा धरणातून येणाऱ्या पाणी पुरवठा योजना विषयांवर चर्चा झाली.
निवृत्त विभाग नियंत्रक तथा सरपंच प्रतिनिधी राजेंद्र देवरे, उपसरपंच चंद्रकांत देवरे, ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र देवरे, किरण देवरे,विष्णू गायकवाड, सुनिल पवार,जेष्ठ गंगाराम देवरे, एस.एन.देवरे, गोविंदराव देवरे, राजाराम देवरे, धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाचे अध्यक्ष सुभाष देवरे,संचालक निरंजन देवरे, पंचायत समितीचे माजी सदस्य राजधर देसले,शिवाजी शैक्षणिक संस्थेचे सचिव रमेश देवरे,जेष्ठ पुरोहित श्रीकांत देशपांडे,सूर्यकांत जोशी,आदर्श शेतकरी महेंद्र देवरे,वृक्षप्रेमी सुभान पिंजारी,व्ही.आर.देवरे, अशोक विस्पुते, देवेंद्र देवरे,दिलीप देवरे,छगन मोहिते,भिलाजी अहिरे,मुकेश घडमोडे,त्रिलोक सोनवणे उपस्थित होते.
रमेश देवरे यांनी अतिवृष्टीमुळे सर्वच शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात पाणी असूनही पंचनामे झाले नाहीत. आमदार, खासदारांकडून तगादा लावत भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी केली. प्राथमिक शिक्षक विकास देवरे यांनी पाणी टंचाईच्या काळात' एकच ध्यास ,जल विकास 'या सोशल मिडियाग्रुपचे प्रमुख स्वप्निल देवरे,हरीश सोनवणेसह मोहिमेत काम केलेल्या सर्वांचे अभिनंदनचा ठराव मांडला.शेतकरी महेंद्र देवरे यांनी नजर आणेवारीसाठी प्रयत्न करणे, पिक विमा समिती गठीत करणे व विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उपलब्ध करावी अशी मागणी केली.माजी सैनिक संजय देवरे यांनी सैनिकांचा गौरव व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.राजेंद्र देवरे यांनी ग्रामपंचायतीच्या कार्यकाळात सर्वच माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साधला जाईल,ग्रामस्थांच्या समस्यांची दखल घेतली जाईल अशी ग्वाही दिली.
गावासाठी योगदान देणा-यांचा होईल गौरव
राजेंद्र देवरे यांनी गावाच्या विधायक कामात काही व्यक्ती नेहमीच योगदान देतात. त्यांचा सार्वजनिक कार्यक्रमात विशेष गौरव केला जाणार असल्याची भावना व्यक्त केली.त्यात स्वयं स्फूर्तीने अंत्यसंस्काराचे विधी करणारे रामराव (टेलर) तात्या ह्याळीस, वृक्षप्रेमी सुभान पिंजारी,सोशल मिडियाद्वारे प्रबोधन करणारे आर.के.टेलर व आदिवासी समाजातील सामाजिक कार्य करणारी आदर्श महिला आदींचा गौरव केला जाणार आहे. राजेंद्र देवरे यांनी आभार मानले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.