water water
उत्तर महाराष्ट्र

धुळे जिल्ह्यातील पाच मध्यम प्रकल्पातून पाणी सोडले जाणार !

पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आकस्मिक पिण्याचे पाणी निश्चिती समितीची बैठक झाली

निखील सुर्यवंशी




धुळे : टंचाईची झळ आणि त्यावर दिलासा देण्याच्या मागण्यांमुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा, अमरावती, वाडी-शेवाडी, अनेर, जामखेडी मध्यम प्रकल्पातून (Small dam) पाणी (water) सोडण्याचा आदेश (Order) जिल्हाधिकारी संजय यादव (Collector Sanjay Yadav) यांनी दिले.

(five medium dam water released dhule district)

श्री. यादव यांनी सांगितले, की पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या (Minister Abdul Sattar) अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आकस्मिक पिण्याचे पाणी निश्चिती समितीची बैठक झाली. तीत जळगाव जिल्हाधिकारी, त्या-त्या तालुक्यांचे तहसीलदार, जिल्हा परिषदेकडून टंचाईमुळे पाणी सोडण्याची मागणी झाली. ती मान्य करण्यात आली.


विविध प्रकल्पांची स्थिती
अक्कलपाडा प्रकल्पातून धुळे व शिंदखेडा तालुक्यातील ३४ गावांसाठी ५४३.८८९ दशलक्ष घनफूट, तर अमळनेर (जि. जळगाव) तालुक्यातील १६ गावांसाठी १०६.६४९ दशलक्ष घनफूट जलसाठा आरक्षित आहे. बैठकीतील शिफारशीनुसार या प्रकल्पातून ६५०.५३८ दशलक्ष घनफूटपैकी पहिले ३२० दशलक्ष घनफूट आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला. अमरावती मध्यम प्रकल्पातील १३६.४९३ दशलक्ष घनफूट पाणी शिंदखेडा तालुक्यातील ११ गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित आहे. या प्रकल्पातून ५६.९३ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचा निर्णय झाला. वाडी-शेवाडी प्रकल्पातील १४५.३५६ दशलक्ष घनफूट पाणी शिंदखेडा तालुक्यातील २० गावांसाठी आरक्षित आहे. यात १२० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याबाबत निर्णय झाला. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील १६ गावांना पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असल्याने अनेर धरणातून (ता. शिरपूर) पाणी सोडावे, अशी मागणी झाली. त्यानुसार अनेर धरणातून जळगाव जिल्ह्यासाठी ९१.२५४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित आहे. पैकी ९१.३५ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे. जामखेली मध्यम प्रकल्पातील १९.२८२ दशलक्ष घनफूट पाणी साक्री तालुक्यातील चार गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित आहे. या प्रकल्पातील १०.२८ दशलक्ष घनफूट पाणी सोडणार आहे.

जबाबदारी निश्‍चित
पाणी सोडण्यापूर्वी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांवरील फळ्या काढल्याबाबत आणि पुन्हा टाकून पाणी अडविले जाणार नाही याबाबत पाटबंधारे विभागाने सनियंत्रण ठेवावे. पाणी अडविले जाणार नाही किंवा अनधिकृत उपसा होणार नाही, याबाबत कार्यवाही करावी. वीज वितरण कंपनीने आवर्तन सोडताना नदीकाठावरील गावांच्या विहिरींवरील वीजजोडणी बंद करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. आवर्तन सोडण्याच्या आदेशानंतर संबंधित यंत्रणेने पाणीपट्टीची रक्कम त्वरित अदा करावी. आवश्यकतेनुसार पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा.

कर्मचाऱ्यांचे पथक स्थापणार
बैठकीतील निर्णयानुसार त्या- त्या ठिकाणी पाणी अखंडपणे प्रवाहित राहील याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत, तहसीलदार, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती, उपअभियंता पाटबंधारे विभाग, वीज कंपनी, पोलिस निरीक्षक, तलाठी, ग्रामसेवक यांच्यावर संयुक्तपणे राहील. याकामी पाटबंधारे विभागाने त्यांच्या स्वस्तरावर अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक स्थापन करावे. त्यात अवैधरीत्या पाणी अडविणे व उपसा करणाऱ्यांवर कार्यवाही करावी, अशी सूचना श्री. यादव यांनी दिली.


( five medium dam water released dhule district)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT