शिरपूर : जंगलात (Forest) गांजा (Cannabis) व हुक्का ओढणाऱ्यांचे संख्या मोठी असून शिरपूर बोराडीजवळील जंगलात पिण्यासाठी जंगलात गांजेकसानी तयार केलेल्या झोपडीचे अतिक्रमण वनविभागाने (Forest Department) उध्वस्त केल्याने निसर्ग मित्रांकडून या कौतुक केले जात आहे.
बोराडी (ता.शिरपूर) घाटातील नांदर्डे रस्त्यालगत वनजमिनीच्या कूप नं.890 मध्ये बांबूची झोपडी तयार केलेली आढळली होती. प्राथमिक चौकशीत परिसरातील गांजेकसानी झोपडी बांधून अतिक्रमण केल्याचे निष्पन्न झाले. त्याबाबत सहायक वनसंरक्षक अमितराज जाधव यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी अतिक्रमण उखाडण्याचे आदेश दिले. वनक्षेत्रपाल आनंद मेश्राम,सांगवीच्या वनक्षेत्रपाल श्रीमती गंभरे यांच्या नेतृत्वाखाली वनपाल पी.एच.माळी, के.डी.गुजर, कपिल पाटील, विवेक सूर्यवंशी, बी.ए.महाले, वानखेडे आदींनी कारवाई करीत झोपडी जमीनदोस्त केली. कारवाईदरम्यान काहींनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. मात्र कायदेशीर कारवाईची तंबी दिल्यानंतर संबंधितांनी काढता पाय घेतला.
जंगलात पार्ट्यांचे अड्डे
जंगल परिसरात हुक्का, गांजा ओढण्यासाठी येणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. काहींनी तर जंगलात कायमस्वरूपी निवारा करण्याचा प्रयत्न चालवल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. तालुक्यात अतिक्रमित वनजमिनीवर गांजाची लागवड मोठ्या प्रमाणावर होत असतांना व्यसनाधीनतेचे देखील प्रमाण वाढले आहे. दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांना अशा निवाऱ्यांचा शोध घेऊन नष्ट करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या.सदर कारवाई दरम्यान काही अज्ञात लोकांनी विरोध केला असता समज देत गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याने त्यांचा विरोध कमी झाला सदर कारवाई वन उपसंरक्षक अमितराज जाधव,शिरपूरचे व इतर कर्मचारी आणि मजुरांनी केली याबाबत वनक्षेत्रपाल शिरपूर यांनी वनपाल पी एच माळी यांना पुढील तपास व कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जंगलात अतिक्रमण
गांजाचे व्यसन असलेल्या व्यसनाधीन लोकांना मोकळ्या व एकांतात गांजा ओढण्यासाठी नव्याने तयार होणारा अड्डा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी उध्वस्त केला आहे.सदर, अड्डा हा तयार होण्यापूर्वीच कर्तव्यदक्ष वनपाल पी एच माळी व कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने उद्धवस्त करण्यात आला आहे. सदर अड्डा हा तालुक्यातील बोराडी नांदरडे रस्त्यालगत घाटीत वनजमीनीच्या कूप क्रं 890 मधील टेकडीवरील जागेवर अतिक्रमण करून,वृक्षांची कत्तल करीत गांजा,चिलम ओढण्यासाठी उपलब्ध साधनांद्वारे झोपडी बांधण्यात येत होती.
गांजा लागवड मोठ्या प्रमाणात
अवैध व बेकायदेशीर वन जमीनीवर गांजा लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. दरवर्षी तालुक्यातील वन जमिनीवरील गांजाशेती वन विभाग व पोलिसांकडून अनेक ठिकाणी उध्दवस्त केली जाते मात्र तालुक्यात पहिल्यांदा गांजा ओढण्यासाठी काही अज्ञातांकडून तयार होणारा अड्डा उद्ध्वस्त वन विभागाने केला आहे. त्यामुळे या कारवाईचे निसर्ग मित्रांकडून कौतुक करण्यात येत आहे. परंतु अजूनही जंगलात आदिवासी भागात कारवाई करणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.