Candidate application 
उत्तर महाराष्ट्र

धुळे-नंदुरबार जिल्हा बँक निवडणूक; तीस उमेदवारांचे ५० अर्ज दाखल

निर्धारित वेळेत आजी- माजी आमदार, संचालकांसह एकूण ४७ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

सकाळ वृत्तसेवा



धुळे : धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Dhule-Nandurbar District Bank Election) पंचवार्षिक १७ जागांच्या निवडणुकींतर्गत आतापर्यंत तीस इच्छुक उमेदवारांनी ५० अर्ज दाखल केले. त्यात सोमवारी (ता.१८) ४७ अर्ज दाखल झाले. धुळे जिल्ह्यातून ३२, तर नंदुरबार जिल्ह्यातून १८ अर्ज दाखल झाले. यातही चौदा उमेदवारांनी २५ अर्ज (Candidate application) दाखल केले आहेत. या प्रक्रियेत आजी-माजी आमदार, संचालकांचाही समावेश आहे. ही निवडणूक सर्वपक्षीय पॅनलद्वारे बिनविरोध करण्याचे नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत माघारीवेळी चित्र स्पष्ट होऊ शकेल.

जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने मंगळवारी (ता.१२) रोजी ही निवडणूक जाहीर केली. यात प्राथमिक कृषी पतसंस्था, विविध सेवा सोसायट्या, आनुषंगिक सहकारी संस्था, संयुक्त शेती संस्था, धान्य अधिकोश सहकारी संस्था, आदिवासी सेवा सहकारी संस्था आदींच्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय प्रतिनिधींच्या प्रत्येकी एकप्रमाणे दहा जागा, महिला प्रतिनिधींच्या दोन, अनुसूचित जाती किंवा जमातीची एक जागा, इतर मागास वर्गातील एक जागा, विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील एक जागा, कृषी व पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया संस्थेची एक जागा, इतर शेती संस्थेची एक जागा, अशा एकूण १७ जागांसाठी निवडणूक होत आहे.


एकूण अर्जांची स्थिती
सुरवातीचे तीन अर्ज वगळता सोमवारी निर्धारित वेळेत आजी- माजी आमदार, संचालकांसह एकूण ४७ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. विविध राजकीय पक्ष, सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींमधून काहींनी दोन, तीन, तर काहींनी चार अर्ज दाखल केले. त्यानुसार आतापर्यंत तीस उमेदवारांनी ५० अर्ज दाखल केले आहेत. जिल्हा बँकेच्या येथील मुख्य कार्यालयातील निवडणूक कक्षात सोमवारी प्रामुख्याने धुळे जिल्ह्यातून बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, सुरेश रामराव पाटील, श्‍यामकांत सनेर, अनिकेत पाटील, प्रभाकर चव्हाण, हर्षवर्धन दहिते, डॉ. दरबारसिंग गिरासे, डॉ. एस. टी. पाटील, भगवान पाटील, तर नंदुरबार जिल्ह्यातून आमदार शिरीष नाईक, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, दीपक पाटील, आमशा पाडवी, भरत माळी यांच्यासह अन्य इच्छुकांनी अर्ज दाखल केले. ही निवडणूक बिनविरोध होण्यापूर्वी प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी समर्थकांसह पात्र लोकप्रतिनिधींना अर्ज दाखल करण्याची सूचना दिली आहे. त्यानुसार सोमवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी झाली.


बुधवारपर्यंत अर्ज स्वीकृती
धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडीच्या निवडणुकीचा कार्यक्रम असा : अर्ज विक्री व दाखल प्रक्रियेची अंतिम मुदत २० ऑक्टोबरपर्यंत सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत, अर्जांची छाननी : २१ ऑक्टोबरला सकाळी अकरापासून, विधीग्राह्य अर्जांची प्रसिद्धी- २२ ऑक्टोबर, माघार- २२ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरपर्यंत सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत, चिन्हवाटप- ९ नोव्हेंबरला सकाळी अकरापासून, मतदान- २१ नोव्हेंबरला निर्धारित केंद्रात सकाळी आठ ते दुपारी चारपर्यंत, मतमोजणीसह निकाल : २२ नोव्हेंबरला सकाळी आठपासून.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Whatsapp Call Recording : मिनिटांत रेकॉर्ड करा व्हॉट्सॲप कॉल, सोपी स्टेप वाचा एका क्लिकमध्ये..

Margashirsha Amavasya 2024: मार्गशीर्ष अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर करा गंगा स्नान, जाणून घ्या महत्व

SCROLL FOR NEXT