धुळे : यंदा पीककर्जाचे उद्दिष्ट ठरविताना जिल्हास्तरीय समित्यांनी केलेली मागणीच कमी असल्याचे दिसून आल्यानंतर धुळ्यासह उत्तर महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांनी त्यांचे (Farmer Khariff loan) पीककर्जाचे आराखडे बदलावेत, त्यात रकमेची वाढ करावी, अशी सूचना सहकार आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार धुळे, नंदुरबार जिल्ह्याच्या (dhule nandurbar district bank) आराखड्यात सरासरी ९० ते १०० कोटींची वाढ होत आहे. असे असले तरी धुळे-नंदुरबार जिल्हा बँक कर्जवाटपात आघाडीवर असून, इतर बँका उदासीन असल्याचे चित्र आहे. (dhule-nandurbar-district-bank-farmer-khariff-loan-distribute)
धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांनी त्यांचे पीककर्जाचे आकडे वाढवून कर्ज फेडणाऱ्यास संधी उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांना आहे. कर्ज वितरणास वाव असल्याचे सरकार सांगत असले तरी पीककर्जवाटप मेपर्यंत संथगतीने होते. पीककर्ज वाढवून मिळण्यास वाव असतानाही तसे उद्दिष्ट न ठरविल्याने त्यात बदल करण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे. यात मागणीच कमी नोंदविली. केंद्र सरकारने पीककर्जासाठी निश्चित केलेले निकष पूर्ण करण्यात ही मागणी कमी असल्याचे दिसून आल्यानंतर आता आकडे पुन्हा बदलून द्या, कर्ज वितरणास वाव असल्याचे बँकांना सांगण्यात आले आहे.
आराखड्यात ९० कोटींची वाढ
कर्ज योजनेत किसान क्रेडिट कार्डचा वापरही वाढविता येणे शक्य असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम सभासद शेतकऱ्यांना कधीही काढता येऊ शकते. यंदा पशुसंवर्धनासाठीही पत आराखड्यात मोठ्या प्रमाणात कर्ज देण्याची तरतूद आहे. या स्थितीत धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील पत आराखड्यात सुमारे ९० कोटी रुपयांवर वाढ होत आहे. तसेच जिल्हा बँकेने आतापर्यंत दोनशे कोटींहून अधिक शंभर टक्के प्रमाणात कर्जवाटप करत आघाडी घेतली आहे, तर इतर सहकारी, राष्ट्रीयीकृत, ग्रामीण व खासगी बँकांच्या कर्जवाटपाची टक्केवारी १५ टक्क्यांवरही जाऊ शकलेली नाही.
बँकेने सर्व पीककर्ज रूपे, केसीसी कार्डमार्फत वाटप केले आहे. जिल्हा बँकेच्या सर्व शाखांमार्फत ८४ मायक्रो एटीएम पूर्णपणे कार्यान्वित झाले आहेत. बँकेची एटीएम सेवा सुरू आहे. जिल्हा बँकेच्या दोन मोबाईल, एटीएम व्हॅन असून, त्याद्वारे मागणीप्रमाणे व प्रत्यक्ष कामकाज आराखड्यानुसार प्रत्येक गावात पीककर्ज रोखीने उपलब्ध करून दिले आहे.
- राजवर्धन कदमबांडे, अध्यक्ष, धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.