धुळे : भाजपचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार जयकुमार रावल (MLA Jayakumar Rawal) यांच्या विधिमंडळातील (Legislature) निलंबनावरून आता जिल्ह्यातील स्थानिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील (OBC political reservation) ओबीसी संवर्गाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या मुद्द्यावर आवाज उठविला असता, त्यांच्यासह भाजपच्या १२ आमदारांना (MLAs) विधिमंडळाच्या कामकाजावेळी निलंबित करण्यात आले. त्याच्या निषेधार्थ भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी येथे निदर्शने करत राज्य सरकारविरोधात (State Government) घोषणाबाजी केली. ( obc political reservation mla canceled dhule bjp aggressive role)
विधिमंडळाचा आखाडा करत तालिका अध्यक्षांना शिवीगाळ आणि धक्काबुक्कीचा ठपका ठेवत भाजपच्या बारा आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले असून, या कारवाईत आमदार रावल यांचा समावेश आहे. त्यामुळे पक्षात संतापाची लाट उसळली आहे. कोरोनाचे संकट असल्याचा खोटा आव आणत विरोधक आपले पितळ उघडे पाडतील, अशा भीतीने या महाबिघाडी, महावसुली सरकारने जनतेच्या प्रश्नांना बगल देत फक्त दोन दिवस स्वार्थीय राजकारण करीत विधिमंडळाचे अधिवेशन घेतले. परंतु यातही ठरवून विरोधकांना हतबल करण्याकरिता रडीचा डाव खेळत भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला उघडे पाडल्यामुळे भाजप आमदारांच्या हक्कावर या कारवाईतून गदा आणली. या घटनेचा तीव्र निषेध करीत असल्याचे भाजपच्या येथील शहर शाखेने सांगितले.
भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन मागे घेत राज्य सरकारने लोकशाहीचा आदर ठेवावा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा देत भाजपचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, उपमहापौर भगवान गवळी, माजी महापौर जयश्री अहिरराव, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, नगरसेवक नागसेन बोरसे, हिरामण गवळी, प्रदीप कर्पे, चंद्रकांत गुजराथी, विजय पाच्छापूरकर, शशी मोगलाईकर, युवराज पाटील, अजय अग्रवाल, मायादेवी परदेशी, यशवंत येवलेकर, विजय जाधव, दगडू बागूल, नरेश चौधरी आदींनी जिल्हाधिकारी कार्यालासमोर निदर्शने केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.