उत्तर महाराष्ट्र

पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी

पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी

सचिन पाटील.

शिरपूर (धुळे) : न्यायालयाच्या आदेशामुळे इतर मागासवर्गीय प्रवर्गाचे आरक्षण रद्द झाल्याने पोटनिवडणूक होत असलेल्या तालुक्यातील पंचायत समितीच्या आठ गणांसाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी केली असून पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची चाचपणी पूर्ण केली आहे. राज्यात सत्तारूढ असल्यामुळे काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे, तर पंचायत समितीची सत्ता राखून असलेल्या भाजपनेही पोटनिवडणुकीतही प्रभाव कायम ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. (dhule-panchayat-samiti-election-political-parties-meet)

तालुक्यातील २८ पंचायत समिती गटांसाठी सात जानेवारी २०२० ला मतदान झाले होते. त्यात भारतीय जनता पक्षाचे २४, तीन अपक्ष, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सदस्य निवडून गेले. तीन अपक्षांनी नंतर भाजपला समर्थन जाहीर केले. त्यामुळे पंचायत समिती सभापती व उपसभापती पदावर भाजपचे सदस्य बिनविरोध आरूढ झाले. मात्र न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्दबातल ठरवल्यानंतर पोटनिवडणूक होत असून १९ जुलैला मतदान होणार आहे.

सात गणांमध्ये होते भाजपचे सदस्य

तालुक्यातील अर्थे खुर्द (सर्वसाधारण महिला), विखरण खुर्द (सर्वसाधारण), तऱ्हाडी त.त.(सर्वसाधारण महिला), वनावल (सर्वसाधारण), जातोडा (सर्वसाधारण महिला), शिंगावे (सर्वसाधारण), करवंद (सर्वसाधारण) व अजनाड (सर्वसाधारण महिला) या गणांसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे. त्यात शिंगावे येथील राष्ट्रवादी काँग्रेस सदस्याचा वगळता अन्य सात गणांमध्ये भाजपचे सदस्य निवडून गेले होते. जिल्हा परिषदेचे सर्व १३ गट ताब्यात असल्यामुळे भाजपचा आत्मविश्वास अधिक दांडगा आहे. आमदार अमरीशभाई पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमच तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपला एकतर्फी वर्चस्व राखणे शक्य झाले. त्यामुळे यंदाही अमरीशभाईंच्या पसंतीचे उमेदवार भाजपतर्फे दिले जातील हे उघड आहे. अपवाद वगळता भाजप पूर्वी निवडून गेलेल्या सदस्यालाच सर्वसाधारण जागेवरुन उमेदवारी देईल अशी अटकळ आहे. त्यामागे आरक्षण रद्द झाल्याने पद गमवावे लागल्याच्या सहानुभूतीचा निकष असू शकतो.

‘मविआ’कडून उमेदवारांची चाचपणी

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनीही आढावा बैठक घेवून उमेदवारांची चाचपणी केली. इच्छुकांकडून मागणी अर्जही भरुन घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीला मात्र तालुका पातळीवरचे प्रमुख आणि अनुभवी पदाधिकारीच अनुपस्थित राहिले. या तिन्ही पक्षांनी आपले उमेदवार निश्चित असल्याचा दावा केला असून आघाडी करण्याबाबतचा निर्णय वरिष्ठ स्तरावरुन होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यात सत्तारुढ मात्र तालुक्यात विरोधकाच्या भूमिकेत असलेली आघाडी सर्वार्थाने ताकदवान भाजपपुढे कसे आव्हान उभे करते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT