धुळे ः गुंतागुंत आणि मानपानात रंगणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत उच्चशिक्षित तरुण अभावानेच उमेदवारी करताना दिसतात. मात्र, या विचारास सावळदे (ता. धुळे) येथील उच्चशिक्षित तरुणासह तरुणीने फाटा दिला आहे. गावविकासासाठी सरसावत त्यांनी निवडणुकीत विरोधकांना पराभूत केले. त्यामुळे या गावात परिवर्तन पॅनलची सत्ता स्थापन झाली आहे.
आवश्य वाचा- बिनविरोध ग्रामपंचायतीनंतर प्रत्यक्ष मतदान झालेल्या ६६ ग्रामपंचायतींसाठी ७७.१७ टक्के मतदान झाले होते.
धुळे तालुक्यात सावळदे तसे विकासाबाबत दुर्लक्षित गाव. त्यात एकूण ६१२ मतदार आहेत. ग्रामपंचायतीच्या एकूण सात जागा आहेत. यात गावविकासासाठी परिवर्तन पॅनलची स्थापना झाली. त्यासाठी सुज्ञ आणि उच्चशिक्षित तरुणांनी पुढाकार घेण्याचे ठाणले. त्यांच्यावर ग्रामस्थांनीही विश्वास दर्शविला. निवडणुकीत सातपैकी या पॅनलच्या चार जागा बिनविरोध झाल्या.
तरुणांनी वेधले लक्ष
उर्वरित तीन जागांसाठी मतदान झाले. नंतर सोमवारी निकाल जाहीर झाल्यावर एसएसव्हीपीएस संस्थेच्या डॉ. पा. रा. घोगरे विज्ञान महाविद्यालयाची बीएसस्सी पदवीधारक आणि झुलॉजी विषयात एमएसस्सी प्रवेशीत २३ वर्षीय कृतिका दशरथ देवरे, बीई मॅकॅनिकल पदवीधारक २५ वर्षीय अभियंता आकाश धनसिंग देवरे आणि सुनंदा महेंद्र देवरे यांनी विजय मिळविला. त्यामुळे सातही जागा पटकावत परिवर्तन पॅनलने सत्ता स्थापन केली. या निवडणुकीत उच्चशिक्षित तरुण आकाश आणि कृतिकाने जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.
विजयी तरुणांवर शुभेच्छांचा वर्षाव
अभ्यास आणि करिअर करताना गावविकासासाठी तरूणांनीही पुढे आले पाहिजे. लोकशाहीची प्रक्रिया कृतीतून समजावून घेत ग्रामपंचायतीचा कारभार कसा चालतो, याव्दारे गावविकासात कसे योगदान देता येऊ शकते यासाठी शिक्षित तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे. याच भावनेतून निवडणूक लढविल्याचे कृतिका देवरे आणि आकाश देवरे या विजयी उमेदवारांनी सांगितले. कृतिकाचे वडील मोहाडी येथील पिंपळादेवी विद्यालयात उपशिक्षक आहेत, तर आकाशचे वडील आदर्श शेतकरी आहेत. त्यांचा धुळे शहरातील देवपूरमधील प्रथम डिस्ट्रिब्युटरर्सचे संचालक भालचंद्र कढरे, शिक्षक लक्ष्मण पाटील आदींनी सत्कार केला. या विजयी सदस्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.