धुळे : सध्या कडक उन्हाळा (Summer) असून, तापमान वाढले आहे. परिणामी नदी, तलाव, सरोवरे यातील पाणी आटत आहे. अशा परिस्थितीत वन्य पशु-पक्षी पाण्याच्या शोधात (birds search of water) भटकंती करत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून धुळे शहरालगतच्या परिसरात पक्ष्यांची संख्या रोडावली आहे. परंतु धुळे शहराजवळ असलेल्या सोनवद येथील तलावावर (Sonwad Lake) वेगळे चित्र बघायला मिळते. दर वर्षी हिवाळ्यात, उत्तरेकडील प्रदेशातील पाहुणे पक्षी (Exotic birds) लांब प्रवास करून आपल्याकडे स्थलांतर करून येतात आणि उन्हाळा सुरू होण्यापूर्वी फेब्रुवारी-मार्चपर्यंत मायदेशी परत फिरतात. मात्र यंदा सोनवद तलावावर काही परदेशी स्थानांतरित पाहुणे पक्ष्यांच्या प्रजाती अजून म्हणजे मेमध्येही दिसून आल्या आहेत.
(Dhule Sonwad Lake Exotic birds extended their stay)
६०६ पक्ष्यांच्या नोंदी
धुळे येथील निसर्गवेध संस्थेचे अभ्यासक संदीप बागल, डॉ. प्रशांत पाटील व डॉ. विनोद भागवत यांनी नुकत्याच केलेल्या अभ्यास मोहिमेत ४६ प्रजातींच्या ६०६ परदेशी स्थलांतरित पक्ष्यांच्या नोंदी केल्या आहेत. या विशेष उल्लेखनीय नोंदीत सात रोहित पक्षी, कवड्या धीवर पक्ष्यांचे कुटुंब, ठिपक्यांच्या टिलवा, छोटा आर्ली, तसेच छोटा टिलवा, कल्लेदार सुरय, केंटीश चिखल्या असे काही पक्षी अजूनही येथे रेंगाळताना दिसून आले आहेत.
पक्ष्यांनी मुक्काम वाढवला
निरीक्षणात या पक्ष्यांच्या शरीराच्या रंगसंगतीत बदल दिसून आला. यावरून असे दिसते, की हे पक्षी आता विणीच्या काळातील नवीन पेहरावात आले आहेत. असे परदेशी स्थलांतरित पक्षी मेअखेर कडक उन्हाळ्यातही आपल्या प्रदेशात अजून मुक्काम वाढवत आहेत, म्हणजेच कदाचित हे निसर्गातील होणाऱ्या बदलाचे गंभीर संकेत असू शकतात. स्थलांतरित पक्ष्यांचा उन्हाळ्याच्या सुरवातीला मायदेशी जाण्याचा परतीचा प्रवास सुरू होतो. कारण त्यांना मूळ जन्मगावी परत जाणे हा त्यांचा जीवनक्रमाचा एक भाग असतो. मूळगावी गेल्यानंतर त्यांचा विणीचा हंगाम सुरू होतो. त्यांच्या शरीरातील रासायनिक क्रियांमुळे पिसांचा तसेच शरीराच्या इतर भागांचे रंग बदलतात. हा त्यांचा विणीच्या हंगामातील पेहराव असतो.
वातावरण बदलांचे परिणाम
सोनवद तलावावर दिसलेल्या पक्ष्यांच्या रंगसंगतीतून विणीच्या हंगामाची सुरवात झालेली दिसते. त्यांचा परतीचा प्रवास अजून बाकी आहे, परंतु वेळ आणि वातावरणातील बदल याच्यामध्ये तफावत असल्याने त्यांना प्रवासातच पेहराव बदलावा लागत आहे. यामुळे कदाचित अशा प्रकारचे चित्र आज आपल्याला पाहायला मिळते. असे ज्येष्ठ पक्षी अभ्यासक डॉ. विनोद भागवत सांगतात. वातावरण बदलांचे परिणाम कदाचित चांगले किंवा वाईटही असू शकतात, यावर अधिक संशोधन करणे आवश्यक आहे. नवीन पिढीतील पक्षीप्रेमींनी प्रामाणिकपणे अभ्यास करून पर्यावरण व निसर्ग संवर्धनात आपले योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केल्याची माहिती प्रा. डॉ. प्रवीणसिंग गिरासे यांनी पत्रकाद्वारे दिली.
(Dhule Sonwad Lake Exotic birds extended their stay)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.