Sindhutai Sapkal 
उत्तर महाराष्ट्र

आपले गाव हे कुटुंब समजून रहा - सिंधुताई सपकाळ

सकाळवृत्तसेवा

सोयगाव : भीमा कोरेगाव सारख्या दुर्दैवी घटना टाळण्यासाठी गाव हे कुटुंब समजून रहा, गावातच सलोखा बाळगा, जातीयवादी कृत्य करणाऱ्या बाहेरच्या लोकांना थारा देऊ नका असे प्रतिपादन समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी मंगळवारी (ता. ९) रात्री घोसला ता.सोयगाव येथे केले. जातीपाती न मानता जीवन जगा, त्यातच खरे सुख असल्याची पुष्टीही त्यांनी दिली. मराठा प्रतिष्ठान आणि त्रिलोकनाथ गोयल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने घोसला ता.सोयगावला समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या आईच्या काळजातून या विषयावर प्रबोधन आयोजित करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या या कार्यक्रमात सिंधुताई सपकाळ बोलत होत्या. दरम्यान कार्यक्रमाच्या प्रारंभी पाचोराचे आमदार किशोर आप्पा पाटील, मराठा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोपान गव्हांडे यांच्या परिवाराने सिंधुताई सपकाळ यांचा नऊवारी देवून सत्कार करण्यात आला.

दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारस असलेल्या दलित मुलालाच मी पहिला मुलगा म्हणून स्वीकार केला त्याच मुलाने माझ्यावर पी.एच.डी केल्याचे त्यांनी सांगितले. जातीपातीच्या मुद्द्यांवर काही मंडळी राज्यात भांडणे लावतात त्यामुळे जातीपातीच्या राजकारणाला बळी न पडता या समीकरणाला थारा न देता जीवन जगण्याचा मूलमंत्र सिंधुताई सपकाळ यांनी दिला. पोलीसही मायेच लेकरू आहे. संरक्षणासाठी रस्त्यावर उभे राहून संरक्षण करणाऱ्या पोलिसांना त्रास देऊ नका असेही त्यांनी सांगितले. दरम्यान शेतकरी आत्महत्या प्रकरणावर बोलतांना त्यांनी सांगितले की, मानसिक स्थिती खराब होणे हेच प्रमुख कारण शेतकरी आत्महत्येच आहे. त्यासाठी शेतकरी पत्नींनो खडतर बाजू असतांना पतीला सांभाळा जीवन मरणाची गाठ तुटू नये याची काळजी घ्या. राज्यातील शेतकरी आत्महत्या कमी होतील असे त्यांनी आवर्जून सांगितले. पाचोरा कडून घोसला ता. सोयगावला येताना मोठा त्रास झाला आहे. या भागातील राजकीय नेते झोपले असतील तर मी तुमच्या सोबत आहे. त्यामुळे सिंधुताई सपकाळ यांनी चक्क पाचोराचे आमदार किशोर आपा पाटील यांनाच सोयगाव भागातील प्रमुख रस्ते दुरुस्तीची गळ घातली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Candidate List: शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर; बीडच्या सस्पेन्सवर पडदा; 'यांना' दिली उमेदवारी

Latest Maharashtra News Updates : भाजप मुंबईत १८ जागा लढवणार

Shivsena UBT Candidate 3rd List : विधानसभेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे आणखी तीन शिलेदार जाहीर! 'येथे' पाहा तिसरी यादी

मंदार देवस्थळींनी सांगितला 'आभाळमाया'चा सर्वोत्तम सीन, म्हणाले- रात्री ९ वाजता सुधीर घरी येतो आणि...

Kuldeep Yadav ला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघातून का वगळलं? खरं कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT