railway track. 
उत्तर महाराष्ट्र

दोन दिवस "ती' होती बेपत्ता...तिसऱ्या दिवशी सापडली रेल्वे ट्रॅकवर

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील कांचननगरातील रहिवासी तसेच नंदिबाई विद्यालयातील पंधरावर्षीय विद्यार्थीनी शनिवार (ता.15) पासुन बेपत्ता होती. सकाळी आसोदा रेल्वेगेटवरील गेटमनला रेल्वेरुळापासून 9 मिटर लांब झुडपात अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळून आला. शनिपेठ पोलिसांना संपर्क केल्यावर तत्काळ पोलिसांनी धाव घेत मृतदेह जिल्हारुग्णालयात दाखल केल्यावर मृतदेहाची ओळख पटली. कोमल हिरामण सोनवणे (वय-15) असे, मयत मुलीचे नाव असून शनिपेठ पेलिसांत अकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. 

कोमल हिरामण सोनवणे (वय-15) हि नंदिनीबाई विद्यालयात इयत्ता दहावीचे शिक्षण घेत होते. कोमल शनिवार (ता.15) पासुन घरातून बेपत्ता झाली होती, कुटूंबीयांनी दिवसभर शोध घेवुन रात्री शनिपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरुन अज्ञात तरुणाच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज सकाळी पावणे नऊवाजेच्या सुमारास आसोदा रेल्वेगेटवरील गेटमन सनकलाल दुबे यांना रुळापासून बऱ्याच लांब झुडपात मृतदेह पडल्याचे आढळून आले. दुबे यांनी स्टेशन मास्टर आणि शनिपेठ पोलिसांना कळवल्यावरुन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. असोदा रेल्वेगेट जवळ मृतदेह आढल्याचे वृत्त कळताच कांचनगर, जैनाबादसहीत परिसरातील रहिवाश्‍यांनीही धाव घेतली. मृतदेह उचलून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आल्यावर परिसरातील रहिवाश्‍यांसह मुलीचे वडील हिरामण सोनवणे यांनी मृतदेह पाहताच हंबरडा फोडला. मुलीची ओळख पटल्यावर पंचनामा करुन शवविच्छेदनास सुरवात करण्यात आली. 

खुन की, रेल्वेचा धक्का ! 
मयत कोमल सोनवणे हिचा मृतदेह रेल्वेरुळापासून तब्बल 9 मिटर लांब झुडपात खड्ड्याजवळ सापडला. रेल्वेचा धक्का लागून नऊ मिटरपर्यंत मृतदेह फेकला जाईल या बाबत पोलिसांना शंका आहे. मयत मुलीचा उजवा हात व दोन्ही पाय फ्रॅक्‍चर असून एका पायाचे हाड बाहेर निघलेल्या अवस्थेत होते. नाकातोंडातून रक्त निघालेले असून मृत्यु नंतर मृतदेह रेल्वेरुळा शेजारी आणुण टाकला की, कसे या बाबत निरीक्षक विठ्ठल ससे, सहाय्यक फौजदार सलिम पिंजारी तपास करीत आहेत. 

पित्याचा आक्रोशीत मागणी 
हिरामण सोनवणे ऑटोरिक्षा चालवून कुटूंबीयांचा उदनिर्वाह करतात, मयत मुलीच्या कुटूंबात आई मंगलाबाई, भाऊ प्रिन्स, यशराज, लहान बहिण सोनी असा परिवार आहे. शनिवार पासून कोमल घरातून बेपत्ता झाली होती. आज तिचा मृतदेह आढळल्याने कुटूंबयांनी प्रचंड आक्रोश केला.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT