नाशिक : मिसळ अन् भत्ता नाव उच्चारलं तरी नाशिककरांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. मिस्सळवर तऱ्हीदार रस्यासोबत कांदा आणखीच स्वाद वाढवतो. तर भत्त्यात शेव-पापडीसोबतही कांदा हवाच असतो. पण सध्या कांद्याचे भाव गगनाला भिडले असल्याने मिसळमध्ये कांद्यात कोबी तर भत्त्यासाठी कोथिंबिर मिसळून दिली जाते आहे. काही हॉटेल व्यावसायिकांनी मेन्यूतून कांद्याचे पदार्थ वघळल्याचे चित्र आहे.
पदार्थात नावापुरता वापर
कांद्याच्या भाववाढीमुळे सर्वसामान्यांकडून वापरात घट केलेली असतांना, हॉटेल व्यावसायिकांनाही समतोल साधतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बहुतांश पदार्थांना चव आणण्यासाठी तिखट मिर्चीप्रमाणे कांद्याचाही वापर केला जातो. परंतु कांद्याचे भाव वाढलेले असल्याने आहे त्या किंमतीत कांद्याचा वापर करणे शक्य होत नसल्याची परीस्थिती आहे. ऑनियन उत्तप्पा, कांदा भजी यांसारखे पदार्थ तर थेट मेन्यूतून कायब झालेले आहेत. तर काहींकडून या पदार्थांमध्ये नावापुरता कांदा वापरला जातोय.
प्लिज मागू नका....
नाशिककरांमध्ये मुख्य आकर्षण असते ते मिसळ आणि भत्त्याचे. कांद्याशिवाय या दोन्ही पदार्थांना अपेक्षित चव मिळत नाही. परंतु वाढीव दरांमुळे बहुतांश व्यावसायिकांना कांदा खरेदी करणे परवडत नसल्याने मिस्सळला पर्याय म्हणून कांद्यात कोबी टाकून दिली जाते आहे. तर भत्त्यासाठी कांदा व कोथिंबिर दिले जात आहे.
काही व्यावसायिक मात्र यात अपवाद असल्याचेही दिसते. गुणवत्ता टिकविण्याच्या हेतूने नेहमी प्रमाणेच कांद्याचा वापर करणारे व्यावसायिकदेखील आढळून आले. अशा व्यावसायिकांकडून आपला नफा घटवून ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच चव देण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
खवय्यांचा हिरमोड
हॉटेलींगसाठी बाहेर पडलेल्या खवय्यांना मात्र मेन्यूतून कांदा गायब झाल्याने हिरमोड होतो आहे. काद्यांचा प्रश्न मिटेपर्यंत बाहेर जेवण टाळण्याकडेही काहींचा वाढता कल असल्याचे चित्र आहे. तर काही खवय्ये कांद्याची मागणी करत प्रसंगी जादा पैसे मोजण्यासाठीदेखील तयार असल्याची स्थिती बघायला मिळते आहे.
नेहमीप्रमाणे ग्राहकांकडून भत्त्यासोबत कांद्याची मागणी होते. परंतु वाढीव दरांमुळे मागणी इतका कांदा पुरविणे अशक्य झाले आहे. यास पर्याय म्हणून कांद्यात कोथिंबिर मिसळून ग्राहकांना दिली जाते आहे. भाव पूर्वपदावर असल्यावर पुन्हा ग्राहकांना मुबलक कांदा उपलब्ध केला जाईल.
- संतोष सानप, भत्ता विक्रेते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.