नंदुरबार ः राज्य शासनाच्या निष्काळजीपणामुळे ओबीसींचे (OBC) राजकीय आरक्षण (Political reservation) संपुष्टात आले आहे. जिल्हा परिषद (Zilla Parishad)व पंचायत समितीच्या (Panchayat Samiti) पोटनिवडणुका (Elections) जाहीर झाल्या आहेत. आतातरी शासनाने (government) न्यायालयात ओबीसींचा आवश्यक तो डाटा जमा करावा व निवडणुकांना स्थगिती मिळवावी, अशी मागणी करत शनिवारी (ता. २६) नंदुरबार व शहादा येथे चक्काजाम आंदोलन ( BJP Movement) करण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्या नंदुरबार प्रभारी खासदार रक्षा खडसे (MP Raksha Khadse) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
(political obc reservation bjp agitation to prevent elections)
खासदार खडसे म्हणाल्या, की ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकावे, यासाठी माहिती सादर करण्यासाठी राज्य शासनाला न्यायालयाने दोन महिन्यांची मुदत दिली होती. तब्बल १६ महिने शासनाने न्यायालयात ओबीसींची माहिती दिली नाही. त्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले. राज्यात ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, राजकीय आरक्षण नसल्यामुळे त्यांना निवडणुका लढविता येणार नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला आहे.
राज्यभर भाजपतर्फे चक्काजाम आंदोलन
नंदुरबारसह राज्यातील पाच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकांपूर्वी शासनाने ओबीसींची माहिती न्यायालयात सादर करून ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे, जेणेकरून ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही. मराठा आरक्षणाबाबतही शासनाने न्यायालयात बाजू मांडली नाही, म्हणून त्यांचेही आरक्षण गेल्याने मराठा समाजावरही अन्याय झाला आहे. याचा निषेध म्हणून शनिवारी राज्यभर भाजपतर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.