नंदुरबार ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या (Farmer) प्रश्नांवर आंदोलनाची ठोस भूमिका घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने (Swabhimani Shetkari Sanghatana) खासदार राजू शेट्टी (MP Raju Shetty) यांच्या नेतृत्वाखाली २८ ऑक्टोबरला सायंकाळी चारला प्रकाशा (ता. शहादा) येथे ऊस परिषद (Sugarcane Council) आयोजित करण्यात आली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष घनश्याम चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रकाशा येथे होणाऱ्या परिषदेत शेतकरी नेते खासदार राजू शेट्टी, रविकांत तुपकर यांच्यासह महाराष्ट्रातून अनेक नेते येणार आहेत. जिल्ह्यात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न असल्यामुळे त्या प्रश्नांना कुठेतरी वाचा फुटली पाहिजे, प्रशासनाकडे सरकारकडे या जिल्ह्याचे प्रश्न मांडले गेले पाहिजे, म्हणून ऊस परिषदचे नियोजन करण्यात आले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तीन टप्प्यांमध्ये जी एफ आर पी देण्याचा जो राज्य सरकारने केंद्र सरकारने निर्णय घेतला, त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठे नुकसान होणार आहे.
चारवर्षापूर्वी ऊस परिषद घेतली होती. तेव्हा या जिल्ह्यांमध्ये ८.३ ची रिकवरी शेतकऱ्यांना मिळत होती. त्यासाठी आम्ही संघर्ष केला. दोन वर्षाच्या संघर्षानंतर १०.४५ टक्के रिकव्हरी आणली आहे. ती देण्यास कारखानदारांना भाग पाडले. परंतु या वर्षी याच कारखानदारांनी हा आकडा थेट ९.३ टक्क्यांवर आणून ठेवला आहे. यावर आणि शेकऱ्यांच्या अन्य प्रश्नांवर ठोस भूमिका घेण्यासाठी २८ ऑक्टोबरला ऊस परिषद बोलवली आह. परिषदेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन घनश्याम चौधरी यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेत नंदुरबार तालुका अध्यक्ष ईश्वर चौधरी, रितेश पटेल आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.