Election Election
उत्तर महाराष्ट्र

नंदुरबार जिल्‍हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने ही पोटनिवडणूक जाहीर केली आहे

सकाळ डिजिटल टीम



नंदुरबार : राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार (Supreme Court) नंदुरबार जिल्हा परिषद (Nandurbar Zilla Parishad) अंतर्गत ११ गट आणि शहादा, नंदुरबार व अक्कलकुवा पंचायत समितीच्या (Panchayat Samiti) एकूण १४ गणांसाठी पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर (Election program announced) केला आहे. १९ जुलैस मतदान होईल, २० जुलैस मतमोजणी (Counting of votes) होणार असून आचारसंहिता (Code of Conduct) लागू केली आहे. (nandurbar zilla parishad panchayat samiti by election announced)


सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्च २०२१ रोजीच्या निर्णयानुसार नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या जागांवर झालेल्या निवडणुका तत्काळ प्रभावाने रद्दबातल ठरवून रिक्त झालेल्या सर्व जागा सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्याबाबत दोन आठवड्याच्या आत निवडणूक प्रक्रिया आरंभ करण्याचे आदेश आयोगाला दिले होते. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने ही पोटनिवडणूक जाहीर केली आहे.

या गटांसाठी निवडणूक
नंदुरबार जिल्हा परिषदेअंतर्गत ८- खापर, ९- अक्कलकुवा, २४-म्हसावद, २९-लोणखेडा, ३१- पाडळदे बु, ३५-कहाटुळ, ३८-कोळदे, ३९-खोंडामळी, ४०-कोपर्ली, ४१-रनाळा, ४२-मांडळ या ११ गटांसाठी, आणि पंचायत समितीअंतर्गत १६-कोराई, ४९-सुलतानपूर, ५१-खेडदिगर, ५३-मंदाणे, ५८-डोंगरगांव, ५९- मोहिदे तह, ६१-जावेद तजो, ६२-पाडळदे ब्रु, ६६-शेल्टी, ७३-गुजरभवाली, ७४-पातोंडा, ७६-होळ तर्फे हवेली, ८५-नांदर्खे आणि ८७-गुजरजांभोली या १४ निर्वाचक गणासाठी पोट निवडणूक होणार आहे.

निवडणूक कार्यक्रम असा
निवडणूक कार्यक्रम प्रसिद्धी मंगळवार २९ जून २०२१
संकेतस्थळावर उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा कालावधी - २९ जून ते ५ जुलै ११ ते ३ पर्यंत
-उमेदवारी मागे घेण्याची तारीख १२ जुलै सकाळी ११ ते दुपारी ३
-उमेदवारांची यादी प्रसिद्धी व निशाणी वाटप - १४ जुलै - दुपारी ३.३० नंतर
-मतदान- सोमवार १९ जुलै २०२१ रोजी सकाळी ७-३० ते सायंकाळी ५-३० या वेळेत
-मतमोणी- मंगळवार २० जुलै २०२१ रोजी सकाळी १० पासून


आचारसंहिता लागू
जिल्‍ह्यात मंगळवारी (ता. २२) आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अमलात राहील. या निवडणुकीकरिता आचारसंहिता जरी संबंधित मतदार संघात लागू झालेली असली तरी पोट निवडणूक असलेल्या निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गणातील मतदारांवर प्रभाव पडेल, अशा तऱ्हेचे कोणतेही धोरणात्मक निर्णय, कोणतीही कृती, घोषणा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, मंत्रिमंडळातील सदस्य, खासदार, आमदार अथवा कोणत्याही पदाधिकाऱ्यांना करता येणार नाही. मतदानाच्यावेळी मतदार कर्मचारी तसेच मतदारांनी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आवश्यक राहील, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hatkanangale Assembly Election 2024 Results : हातकणंगले मतदारसंघात महायुतीच्या अशोकराव मानेंनी 46 हजार 397 मतांनी मिळवला विजय

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना आमदारही बनता येईना ; निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का !

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ठाण्यात केदार दिघेंचे डिपोझिट जप्त

Dilip Sopal won Barshi Assembly Election : बार्शीमध्ये दिलीप सोपलचं! शिवसेना शिंदेच्या राजेंद्र राऊतचा पराभव

Rais Shaikh Won In Bhiwandi East Assembly Election : भिवंडी पूर्वेत रईस शेख विजयी; शिवसेनेच्या संतोष शेट्टींचा मोठ्या फरकाने पराभव

SCROLL FOR NEXT