Biodiesel Biodiesel
उत्तर महाराष्ट्र

नंदुरबार जिल्ह्यात अनधिकृत बायोडिझेल केंद्राचे तरारले पीक

महाराष्ट्र राज्य अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात बायोडिझेलच्या साठवणूक, पुरवठा व विक्री याबाबत अनेक तक्रारी शासनास प्राप्त झाल्या आहेत.

विनोद सुर्यवंशी

नवापूर : बायोडिझेलची (Biodiesel) विक्री करण्यासाठी शासनाचे आवश्यक बारा परवाने, नाहरकत दाखले आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची (District Supply Officer) लेखी परवानगी असल्याशिवाय पंप सुरू करता येत नाही. असे असताना नवापूर तालुक्यात बायोडिझेल मिळण्याचे केंद्र (Biodiesel Center) जागोजागी फोफावले आहेत. महामार्गावर (Highway) याची सर्रास विक्री सुरू असूनही पुरवठा विभागाला मात्र याचा मागमूसही लागत नसल्याचा प्रकार सुर आहे. काही नाममात्र कारवाई झाली, पण त्यात कुणीही व्यक्ती न सापडता फक्त रिकामे ड्रम सापडले आहेत. प्रशासनातील काहींबरोबरच या गोरखधंद्यात सहभागी असलेल्यांची मोठी साखळी असल्याची चर्चा आहे.

(spread network of unauthorized biodiesel stations in nandurbar district)

महसूल विभागाने नुकतीच शहरातील पाडवी हौसिंग सोसायटीमध्ये मेहबूब लाखाबाई आगाम व राजेश गावित यांच्या घराच्या शेजारील पत्र्याच्या शेडमध्ये आणि कोठडा (ता. नवापूर ) रेल्वे गेट जवळ बंद हॉटेलच्या शेजारी पत्राच्या शेडमध्ये अशा दोन ठिकाणी अनधिकृत बायोडिझेल विक्रीप्रकरणी कारवाई करीत सिल केले. मुद्देमाल मिळाला नाही, मात्र रिकाम्या टाक्या आढळून आल्या म्हणून 'जागेचा गैरवापर होऊ नये यासाठी सील' लावले. विसरवाडी व मोरकरंजा परिसरात तक्रार असूनही महसूल विभागाच्या हाती काही लागले नाही. बायोडिझेल विक्री करणाऱ्या विरुद्ध कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. बायोडिझेलचे नमुनेही घेण्यात आले नाहीत. याप्रकरणी जिल्हाधिकारी मनीषा खत्री कोणतं पाऊल उचलतात त्याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. महसूल विभाग जबाबदारी झटकत एक प्रकारे अवैध बायोडिझेल पंप चालकांना अभय देत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत तालुक्यातील काही राजकीय व लोकप्रतिनिधींनी तक्रार केली आहे.


कारवाई, पण पुरावे नाही
विसरवाडी व मोरकरंजा येथील हॉटेल समोरील मोकळ्या जागेत अवैध बायोडिझेल विक्री होते. मात्र पुरवठा निरीक्षक यांच्या पथकाला पुरावे मिळाले नाही. नंदुरबार शहर, खापर, नवापूर तालुक्यातील कोठडा, विसरवाडी, नवापूर रेल्वेगेट तर काही ठिकाणी पत्राच्या शेडखाली ड्रममध्ये साठवलेल्या बायोडिझेलची विक्री होते.


परवाना नाही, विक्री मात्र सुरू
महाराष्ट्र राज्य अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात बायोडिझेलच्या साठवणूक, पुरवठा व विक्री याबाबत अनेक तक्रारी शासनास प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने शासनाने वाहनांना थेट बायोडिझेल विक्री करण्यास मनाई करत नोंदणीशिवाय बायोडिझेल उत्पादन, साठवणूक, पुरवठा व विक्री करण्यासाठी सुलभ सुविधेसाठी बारा प्रकारच्या परवानगीसह जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक आहे. मात्र नवापूर तालुक्यातील बायोडिझेल पंप चालकांकडे जिल्हा पुरवठा अधिकारी यांचा नाहरकत दाखला अद्यापही नाही, तरी विक्री सुरू आहे.


जिल्ह्यात अनधिकृतरित्या बायोडिझेल केंद्र सुरू असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना तहसीलदारांना दिलेल्या आहेत. परवान्यासाठी आमच्याकडे आलेल्या प्रस्तावांपैकी पाच परिपूर्ण प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविले आहेत.
-महेश शेलार, जिल्हा पुरवठा अधिकारी, नंदुरबार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Anil Deshmukh Attack: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला! शरद पवार काय म्हणाले? तर सुप्रिया सुळेंचा थेट इशारा

Railway News: पश्चिम रेल्वेला लागले सुरक्षेचे ‘कवच’, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Updates : राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी जावेद अख्तर यांना दिलासा

Nagpur East Assembly Election : पूर्व नागपूरच्या निवडणुकीत अपक्ष कुणाला देणार धक्का? चौरंगी लढतीने निवडणुकीत चुरस

Trending : 10 वर्ष,47 वेळा केली चोरी; न्यायालयाने दिली अशी शिक्षा की पूर्ण करायला घ्यावे लागतील 4 जन्म

SCROLL FOR NEXT