kishor patil 
उत्तर महाराष्ट्र

शेतकऱ्यांचे गट करून बांधापर्यंत खते, बियाणे देणार  : आमदार किशोर पाटील

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा : गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. रुग्णसंख्या व मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासन व प्रशासन विविधांगी निर्णय घेऊन कोरोनापासून जनतेला दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजपासून ३१ मेपर्यंत ‘लॉकडाउन’चा चौथा टप्पा जाहीर करण्यात आला आहे. या दिवसांत शेतकरी खरिपाच्या तयारीला लागतात. कपाशीच्या मे लागवडीला गती दिली जाते तसेच खरिपासाठी कोणते बियाणे पेरावे, खते कोणती घ्यावीत व एकूणच शेतीचे नियोजन कसे करावे, याबाबत शेतकऱ्यांकडून कृषी केंद्रचालकांकडे अथवा कृषी अधिकाऱ्यांकडे विचारपूस केली जाते.

शेतकऱ्यांना या धावपळीत कोरोना विषाणूची लागण वाढण्याची भीती लक्षात घेता, शहरी व ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे गट तयार करून शासकीय यंत्रणेमार्फत बियाणे व खतांची मागणी मागवून शेतकऱ्यांना शेतीच्या बांधापर्यंत खते व बियाणे पोहोचण्याबाबतचे नियोजन केले जात आहे, अशी माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली. 
शहरातील आशीर्वाद इन्फ्राच्या दालनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष शरद पाटे, मुकुंद बिल्दीकर, दादाभाऊ चौधरी, राजेश पाटील उपस्थित होते. आमदार पाटील यांनी पाचोरा- भडगाव मतदारसंघात नागरिकांनी ‘जनता कर्फ्यू’ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद देऊन समाधान व्यक्त केले. ‘लॉकडाउन’च्या चौथ्या टप्प्यातही अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद ठेवून कोरोनाची साखळी तोडावी, असे आवाहन केले. कोरोना काळात सुरवातीला काही दिवस हजारो जनतेला भोजनाचे वाटप, त्यानंतर किराणा किटचे वाटप, कोरोना रुग्ण व कोरोना योद्ध्यांना उकडलेल्या अंड्यांचे वाटप केले असून आता पोलिस, महसूल, आरोग्य विभाग, राजकारणी, माध्यमांच्या प्रतिनिधींना व कोरोनाबाधित परिसरातील रहिवाशांना होमिओपॅथीच्या गोळ्यांचे वाटप करायचे असल्याने त्यांनी स्पष्ट केले. 

‘नो हॉकर्स झोन’ जाहीर 
शहरातील शिवाजी महाराज चौक ते रेल्वेस्थानक रस्ता तसेच जामनेर रस्ता, भडगाव रस्ता व बसस्थानक रस्ता या शहराच्या चार मुख्य रस्त्यांना ‘नो हॉकर्स झोन’ म्हणून जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या रस्त्यांवर एकही भाजीपाला अथवा फळविक्रेता व्यवसाय करणार नाही; अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. 

कापूस खरेदी केंद्रे वाढविणार 
शेतकऱ्यांकडे असलेला कापूस धिम्या पद्धतीने विकला गेला तर नवीन कापूस घरात येईपर्यंत या कापसाची विक्री सुरू राहील, असे सांगून पाचोरा व भडगावला सुमारे १५ जिनिंग कापूस खरेदी केंद्रे म्हणून सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. यासंदर्भात त्वरित निर्णयासाठी सहकार निबंधक व तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली जिनिंग मालकांची बैठक घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मका, ज्वारी, बाजरी यांची हमीभावाने खरेदी करण्यासाठी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार असून, त्यासाठी पाचोरा व भडगाव येथील शेतकरी संघात नोंदणी सुरू आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. शेतीविषयक सर्व व्यवहार कसे सुरळीत होतील, याबाबत वरिष्ठ अधिकारी व कृषी अधिकाऱ्यांशी बोलून मार्ग काढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कृषी सेवा केंद्रचालक, कृषी अधिकारी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, विकास सोसायटीचे पदाधिकारी यांच्या बैठका घेऊन शेतकऱ्याला लागणारी बियाणे, खते व इतर माल त्यांच्या बांधापर्यंत कसा पोहोचवता येईल, यासाठी तातडीने निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

‘ग्रीन झोन’मध्ये जाण्यासाठी प्रयत्नशील 
पाचोरा व भडगाव तालुका ‘ग्रीन झोन’मध्ये जाण्यासाठी सर्वार्थाने प्रयत्न सुरू आहेत, असे सांगून आमदार पाटील यांनी सांगितले, की त्यासाठी नागरिकांनीही तेवढ्याच जबाबदारीने मदत व सहकार्य करावे. घाबरू नये; पण काळजी घ्यावी. घराबाहेर पडू नये. शासनाचे नियम व सूचना पाळाव्यात. अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर आल्यास मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. पत्रकार परिषद सुमारे तासभर चालली. शरद पाटे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adani Group: अदानी ग्रुपवर गुंतवणूकदारांनी केला मोठ आरोप; सेबीने पाठवली नोटीस, काय आहे प्रकरण?

Diwali 2024: दिवाळीत माता लक्ष्मी अन् भगवान गणेशाची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवायची? वाचा एका क्लिकवर

Nashik Political News : बाळासाहेब थोरातांशी भेटीनंतर गावितांचा प्रवेशाचा मार्ग सुकर! लवकरच प्रवेश होणार, कामाला लागण्याच्या सूचना

Fraud Calls : अलर्ट! या नंबरवरुन येणारे कॉल आहेत धोक्याचे; क्षणात होऊ शकतो मोबईल हॅक अन् अकाउंट रिकामं

Share Market Opening: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स 100 अंकांनी खाली, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT