साक्री : साक्री शहरातील धुळे- सुरत राष्ट्रीय महामार्गावर (Dhule-Surat National Highway) बंजारातांड्याजवळ साक्री पोलिस (Sakri police) ठाण्याचे वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकला (Truck) अडवून कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याने दंड भरावा लागेल, असे सांगितले. त्या वेळी आयशरचालकाने आताच साध्या गणवेशातील पोलिसाला दंडाची रक्कम दिल्याचे सांगितले. यातून दोन पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद होऊन महामार्गावरील वाहतूक खोळंबण्यासह बघ्यांची गर्दी झाली होती. (sakri two traffic police fines over dispute)
नेर येथून लग्नाचे वराड घेऊन जाणारा आयशर (एमएच १८, बीजी २९३४) दहिवेल गावाकडे जात असताना, साध्या वेशातील एका पोलिस कर्मचाऱ्याने पावती न देता दंडाची रक्कम आयशरचालकाकडून वसूल केली. त्याचवेळी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी आयशरचालकाला कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगत दंड भरण्यास सांगितले. त्यावर चालकाने आताच दंडाची रक्कम दिल्याचे सांगितले. पैसे घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याने फोन करून विचारणा केली. पैसे घेणारा पोलिस आयशरजवळच होता. या वेळी दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये दंडाची पावती आकारण्यावरून शाब्दिक वाद झाले. पावती बुक नसताना दंडाची रक्कम घेतली कशी, यातून वाद चिघळला. दोन्ही पोलिसांमध्ये वाद टोकाला जात असल्याचे पाहून अज्ञात व्यक्तीने याबाबत साक्री पोलिस ठाण्यात भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक दोन कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले.
दोघांमध्ये वाद कशामुळे झाला, याची माहिती घेतली. कर्मचाऱ्याने सुटे नसल्याने पैसे स्वतःजवळ ठेवत वाहतूक शाखेकडून पावती घेणार होतो. हा वाद पैशांवरून नाही, तर दंडाच्या रकमेवरून झाल्याचे एकाने सांगितले. ट्रकचालकालाही दंडाची रक्कम कोणाकडे दिली, असे विचारले. त्याने साध्या गणवेशातील पोलिस कर्मचाऱ्याला दिल्याचे सांगितले. वाहतूक हवालदाराने दंड भरलेल्या रक्कमेची पावती आयशरचालकाच्या हातात देत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी चालकासह वऱ्हाडी अन् बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.